सोलो ट्रिप प्लॅन केली असेल तर ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

चंदा मांडवकर :

एकटे फिरायला जाण्याचा अनुभव हा फार आव्हानात्मक आणि मजेशीर ही असतो. त्याचसोबत अशा ट्रिपमध्ये आलेले अनुभव ही आपल्याला पुढील डेस्टिनेशच्या ट्रिपसाठी काहीतरी सांगून जातात. या प्रवासादरम्यान भेटलेली नवी मंडळी, केलेल्या सर्व नव्या गोष्टी कायम लक्षात राहणाऱ्या ठरतात. त्यामुळे सोलो ट्रिपची आयुष्यात एकदा तरी मजा घेतलीच पाहिजे. मात्र त्यावेळी ही काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे असते. अन्यथा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

  • ठिकाणाबद्दल पूर्णपणे माहिती मिळवा

Let a solo escapade soothe your soul amid Covid-19 - Times of India

ज्या ठिकाणी तुम्ही सोलो ट्रिप करणार आहात त्या बद्दल संपूर्ण माहिती मिळवा. तेथील वातावरण, प्रवासाची साधन काय आहेत हे पहा. जेणेकरुन तुम्हाला त्यानुसार तुमची बॅग भरण्यास मदत होईल. त्याचसोबत तुमचा एखादा मित्र त्या ठिकाणी यापूर्वी जाऊन आला असेल तर तुम्ही त्याच्याकडून ही अधिक माहिती घेऊ शकता. आता तर बहुतांश ठिकाणच्या सोलो ट्रॅव्हलर्सचे ब्लॉग्स ही इंटरनेटवर उपलब्ध असतात. याची सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते.

  • राहण्याची व्यवस्था पहा

22 Top Indian Destinations for Solo Women Travellers

ट्रिपचा दुसरा आणि महत्वाचा नियम म्हणजे राहण्याची व्यवस्था. कारम ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तेथे राहण्यासाठी कोणते हॉटेल्स, झॉस्टेल्स किंवा होमस्टे आहे ते पहा. यावेळी तुमची सुरक्षितता फार गरजेची असते. त्यामुळे ट्रिपला निघण्याच्या काही दिवस आधीच राहण्याच्या व्यवस्थेबद्दल बुकिंग करु ठेवा.

  • महत्वाची कागदपत्र सोबत ठेवा खरंतर हा नियम सर्वच पर्यटकांना लागू होते. पण सोलो ट्रॅव्हर्लसाठी हा फार महत्वाचा आहे. तुमची महत्वाची कागदपत्र तुमच्यासोबत राहू द्या. कारण बहुतांश ठिकाणी तुमचे ओळखपत्र मागितले जाते. मूळ कॉपीसह फोटोकॉपी ही सोबत ठेवा.
  • विचारपूर्वक बॅगपॅक करा सोलो ट्रिपवेळी आपल्या जबाबदारीसह आपले सामान स्वत:लाच सांभाळायचे असते. शक्य झाल्यास बॅकपॅक घ्या ज्यामध्ये कपडे ते अन्य महत्वाच्या गोष्टी व्यवस्थितीत राहतील. असे कपडे पॅक करा की, जे तुम्ही मल्टीपल पद्धतीने घालू आणि वापरु ही शकता.

हेही वाचा :