घरलाईफस्टाईलअशी थांबवा 'अॅसिडिटी'

अशी थांबवा ‘अॅसिडिटी’

Subscribe

सध्याच्या धावपळीच्या जिवनात जेवणाची वेळ ठरलेली नसते. यामुळे अॅसिडिटी सारखे आजार डोक वर काढतात. मात्र ही सतत सतावणारी अॅसिडिटी घरच्या उपायांनी देखील दूर होऊ शकते. चला तर जाणून घेऊया अॅसिडिटीवर रामबाण उपाय...

अनियमित जेवणामुळे अॅसिडिटीचा त्रास होण्यास सुरुवात होते. अॅसिडिटीमुळे पोटदुखी, छातीत जळजळ, डोके दुखणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. अशा या त्रासदायक अॅसिडिटीला दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय…

solution for acidityअॅसिडिटी आणि गॅस दूर करण्यासाठी पाणी हा त्यावर एक रामबाण उपाय आहे. दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने अॅसिडिटी झाल्यास ती कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

solution for acidity

अॅसिडिटी झाली असेल तर काही खाल्यानंतर थोडासा गुळ खावा. यामुळे अॅसिटीडी कमी होते.

- Advertisement -

solution for acidity

अॅसिडिटीवर तुळशीची पाने एक उत्तम उपाय आहे. नियमित तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने अॅसिडिटी होत नाही.

 

solution for acidityअॅसिडिटी झाल्यास मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून तो मुळा खावा. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

solution for acidity

अॅसिडिटी झाल्यास फ्रिजमधील थंडगार दूधामध्ये बर्फ घालून ते दूध प्यायल्याने अॅसिडिटी कमी होते. त्याचबरोबर दुधात मनुका घालून दूध उकळून ते थंड करुन प्यावे यामुळे अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो.

solution for acidity

नियमित जेवणानंतर लवंग चघळल्यास अॅसिडिटीपासून आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -