स्किनची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींना मेकअप करताना खूप काळजी घ्यावी लागते. यामागचं कारण म्हणजे या व्यक्तींची त्वचा खूप संवेदनशील असते आणि कोणत्याही चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्ट्समुळे यांना त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा रॅशेस इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. योग्य प्रॉडक्ट्सची निवड केल्याने तुम्हाला हा त्रास होणार नाही. तुम्ही सुरक्षित आणि सुंदर मेकअप लूक मिळवू शकता. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात काही उपयुक्त मेकअप टिप्स.
योग्य प्रॉडक्ट्स निवडा
स्किन ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी योग्य प्रॉडक्ट्सची निवड करणे अत्यंत गरजेचं आहे. हायपोअलर्जेनिक किंवा डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड असलेले मेकअप प्रॉडक्ट्स वापरा.फ्रॅग्रन्स-फ्री आणि पॅराबेन-फ्री प्रॉडक्ट्स तुम्ही वापरू शकता. मिनरल-बेस्ड मेकअप जसे की मिनरल फाउंडेशन वापरू शकता. तुमची त्वचा जास्त संवेदनशील असल्यामुळे हे तुमच्यासाठी उत्तम आहे.
पॅच टेस्ट करा
कोणतेही नवीन प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी 24 तास आधी हाताच्या मागच्या भागावर किंवा कानामागे टेस्ट करून बघा. जर ते तुमच्या स्किन टोनवर मॅच होत असतील तर तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
त्वचेची योग्य काळजी घ्या
मेकअप करण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.खूप जड किंवा ऑइल-बेस्ड मेकअप टाळा, कारण त्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
योग्य मेकअप निवडा
या व्यक्तींनी योग्य मेकअपची निवड करणे अत्यंत गरजेचं आहे. वॉटर-बेस्ड किंवा मिनरल फाउंडेशन वापरा.सिलिकॉन-बेस्ड कंसीलर निवडा यामागचं कारण म्हणजे ते ऍलर्जी होण्याची शक्यता कमी करते.नैसर्गिक घटक असलेली आणि लीड-फ्री लिपस्टिक वापरा.
मेकअप ब्रश आणि स्पंज स्वच्छ ठेवा
आठवड्यातून किमान 1-2 वेळा ब्रश आणि स्पंज धुवा. स्वच्छ हातांनीच मेकअप लावा.
रात्री मेकअप काढा
ऍलर्जी-फ्री मेकअप रिमूव्हर वापरून चेहरा स्वच्छ करा. शक्यतो माइसेलर वॉटर किंवा नैसर्गिक तेल जसे की नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा.
हेही वाचा : Beauty Tips : बटाटे आणि टोमॅटो ज्यूस ग्लोइंग स्किनसाठी परफेक्ट
Edited By : Prachi Manjrekar