Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenRecipe : चटपटीत पालक पुरी

Recipe : चटपटीत पालक पुरी

Subscribe

बाहेरचे पदार्थ न खाता जर का काही चटपटीत पदार्थ घरीचा बनवता आले तर… अशीच एक चटपटीत रेसिपी आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

साहित्य :

 • 2 जुडी पालक
 • 4 वाटी गव्हाचे पीठ
 • 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट
 • 1 चमचा जिरेपूड
 • 1 चमचा धणे
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1 चमचा लाल मिरची पावडर
 • कोथिंबीर
 • मीठ

कृती :

Palak Puri

 • सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून त्याची पाने वेगळी करा. आता त्यांना एक कप पाण्यात उकळवा आणि थंड झाल्यावर बारीक चिरून घ्या.
 • एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन पालक प्युरी, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि जिरेपूड एकत्र करून पीठ व्यवस्थित मळून घ्या.
 • दुसरीकडे पनीर घेऊन ते मॅश करा आणि त्यात धणे, लाल मिरची आणि गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घाला.
 • पीठाचे छोटे गोळे करून त्यात हे पनीरचे मिश्रण भरून हाताने सपाट करा किंवा शॉर्टब्रेडच्या आकारात लाटून घ्या.
 • आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि ते सोनेरी होईपर्यंत तळा.
 • तयार पालक पुरी सर्व्ह करा.

हेही वाचा :

Matar Chaat : झटपट बनवा मटार चाट

- Advertisment -

Manini