बऱ्याचदा नाश्तासाठी काय करावं, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चटपटीत स्नॅक्स रेसिपी कशी बनवायची ते दाखवणार आहोत.
साहित्य :
- चमचा तेल
- हिरव्या मिरचीचे तुकडे
- 2 चमचे शेंगदाणे
- 1 कप कुरमरे
- 1 कप टोमॅटो
- 1 चमचा चाट मसाला
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून त्यात मिरची चांगली परतवूनन घ्यावी.
- त्यानंतर त्यात शेंगदाणे, कुरमुरे, मीठ, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून चांगले परतवून घ्यावे.
- या मिश्रणात हवे असेल तर तुम्ही चाट मसाला देखील मिक्स करु शकता.
- अशाप्रकारे झटपट चटपटीत असा ‘स्नॅक्स’ तयार
हेही वाचा :