आपल्या अवतीभवतीचे ऋतूचक्र बदलू लागले आहे. विशेषत: धूळ-माती आणि प्रदूषण यांमुळे आपण वारंवार आजारी तर पडतोच शिवाय आपले सौंदर्यही बिघडू लागते. केसांवर तर याचा फारच परिणाम दिसून येतो. आपले केस प्रदूषणामुळे कोरडे होऊ लागतात, त्यांच्यावरची चमक निघून जाते आणि केस गळू लागतात. अनेकदा आपले केस दुतोंडी होतात. केस जास्त खेचल्यामुळे, केसांना स्ट्रेट करणारी उपकरणं वापरल्याने किंवा शरीरातील काही पोषकतत्त्वे कमी झाल्यामुळे केस दुतोंडी होऊ लागतात. परंतु याने घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी या समस्या दूर होऊ शकतात. जाणून घेऊयात या सोप्या उपायांविषयी.
ऑलिव्ह ऑईल आणि मध :
ऑलिव्ह ऑईल आणि मध समान प्रमाणात मिसळून केसांना लावा. हे मिश्रण केसांना खोलवर हायड्रेट करते, ज्यामुळे केस मऊ आणि निरोगी राहतात. मधामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे खराब झालेले केस दुरुस्त करण्याचे काम करतात.
आवळा आणि शिकेकाई पावडर :
आवळा आणि शिकेकाई पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. या उपायामुळे केसांना पोषण मिळते व केसांची मुळे मजबूत होतात. ज्यामुळे दुतोंडी केसांची समस्या कमी होते.
नारळ तेल :
खोबरेल तेल हे केसांसाठी वरदान आहे. हे केसांना खोलवर जाऊन नरमपणा देते आणि त्यांना तुटण्यापासून वाचवते. खोबरेल तेल लावून रात्रभर झोपल्याने दुसऱ्या दिवशी केसांना चमक येते आणि स्प्लिट एंड्स म्हणजेच दुतोंडी केस कमी होतात.
ब्राह्मी तेल :
ब्राह्मी तेल केसांच्या पोषणासाठी उत्कृष्ट मानले जाते. हे तेल केस तुटण्यास प्रतिबंध करते आणि त्यांना मजबूत करते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाने टाळूला मसाज केल्यास .
कोरफड जेल :
कोरफडीमध्ये मुरुमं दूर करण्याचे आणि केस मऊ करण्याचे गुणधर्म आहेत. केसांवर ताजे कोरफड जेल लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवा. हे केसांची ताकद वाढवण्यास मदत करेल आणि स्प्लिट एंड्सदेखील कमी करेल.
दही आणि लिंबाची पेस्ट :
दही आणि लिंबाची पेस्ट केसांना पोषण देते तसेच केसांची पीएच पातळी नियंत्रित ठेवते. त्यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. आठवड्यातून एकदा तरी याचा वापर करावा.
मुलतानी माती आणि गुलाब पाणी :
मुलतानी माती आणि गुलाबपाणी यांची पेस्ट केसांना लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. हे केसांना खोलवर स्वच्छ करते ज्यामुळे केस हलके आणि मऊ होतात.
कडुलिंबाच्या झाडाची पाने :
कडुलिंबाची पाने उकळून तयार केलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसांना चमक येते आणि केस फुटण्याची समस्या कमी होते. कडुनिंबात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
दुतोंडी केसांची समस्या दूर करण्यासाठी या उपायांचा घरच्या घरी जरुर वापर करा.
हेही वाचा : Hair Spa : थंडीत हेअर स्पा करताय?
Edited By – Tanvi Gundaye