बदलत्या ऋतूमानानुसार, फॅशन ट्रेंडही बदलत असतो. स्प्रिंग सीझन सुरू झाला आहे आणि या ऋतूमध्ये सौम्य थंडी आणि सौम्य उष्णता देखील असते. असं हवामान खूप आल्हाददायक असतं आणि या हवामानात हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांची रोपं दिसू लागतात. जर तुम्हाला या ऋतूत फुलांसारखा सुंदर लूक हवा असेल तर तुम्ही काही फ्लोरल कुर्ती ट्राय करू शकता. जाणून घेऊयात काही अशा फ्लोरल कुर्ती डिझाइन्स बद्दल ज्या तुम्ही स्प्रिंग सीझनसाठी हमखास वापरू शकता.
थ्रेड वर्क कुर्ती :

वसंत ऋतूमध्ये सुंदर लूक मिळवण्यासाठी तुम्ही या प्रकारची कुर्ती घालू शकता. या कुर्तीवर खूप सुंदर धाग्याचे काम केलेले
असते जे तुमच्या लूकला अधिक स्टायलिश बनवते. या प्रकारची कुर्ती तुम्हाला 600 रूपयांपासून सहज मिळू शकते. तुम्ही ही कुर्ती बाजारातून किंवा ऑनलाइनही खरेदी करू शकता.तुम्ही ही कुर्ती पलाझो किंवा जीन्ससह स्टाईल करू शकता. तुम्ही यावर दागिने म्हणून झुमके घालू शकता. यावर फ्लॅट चप्पल एक क्लासी लूक देतील.
कॉटन कुर्ती :

सुंदर लूक मिळवण्यासाठी, तुम्ही या प्रकारची कॉटन कुर्ती देखील निवडू शकता ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल तर वाटेलच पण सोबतच एक सुंदर लूकदेखील मिळू शकेल.
एम्ब्रॉयडरी वर्क कुर्ती :

वसंत ऋतूमध्ये फ्लोरल लूक मिळवण्यासाठी तुम्ही या प्रकारची भरतकाम केलेली कुर्ती देखील निवडू शकता. या प्रकारच्या भरतकाम केलेल्या कुर्तीमध्ये अनेक रंग आणि डिझाइन्सचे पर्याय तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही ही कुर्ती ऑफिसमध्ये किंवा प्रवासादरम्यान घालू शकता आणि या कुर्तीमध्ये तुमचा लूक खूप सुंदर दिसेल.
फुलांच्या प्रिंटची कुर्ती :

स्टायलिश लूकसाठी तुम्ही या प्रकारच्या फ्लोरल प्रिंट कुर्तीला स्टाईल करू शकता . नवीन आणि स्टायलिश लूक मिळविण्यासाठी हे फ्लोरल प्रिंट सर्वोत्तम आहे आणि या प्रकारच्या कुर्तीमध्ये तुमचा लूक खूप सुंदर दिसेल. तुम्ही या प्रकारची कुर्ती 600 ते 700 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही ही कुर्ती काळ्या किंवा डेनिम जीन्ससोबत घालू शकता.
हेही वाचा : Pregnancy Care Tips : प्रेग्नेंसीमध्ये ही पुस्तके वाचणे उत्तम
Edited By – Tanvi Gundaye