Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Health शिळं आणि अनहेल्दी फूड ठरु शकते PCOS चे कारण

शिळं आणि अनहेल्दी फूड ठरु शकते PCOS चे कारण

Subscribe

पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि वायरस खुप सक्रिय होतो आणि त्यामुळेच विविध आजार आपल्याला होतात. या व्यतिरिक्त आपली स्वच्छता आणि खाण्या-पिण्यासंदर्भात अधिक सतर्कता बाळगली पाहिजे. पावसाळ्यात आपण काळजी घेतो पण शिळं आणि अनहेल्दी फूड्सचे सेवन करण्यापासून दूर रहावे असे ही सांगितले जाते.(Stale and unhealthy food)

पावसाळ्यात आपण काही भाज्या खाणे टाळले पाहिजे. कारण त्या दीर्घकाळ स्टोर करुन ठेवल्याने काही प्रकारचे बॅक्टेरिया त्यावर जमा होतात. त्यामुळे विविध आजार होऊ शकता. पावसाळ्यात शिळ्या भाज्यांचे अजिबात सेवन करु नये. भाज्या शिळ्या होण्याचे कारण म्हणजे आपण त्या भांड्यात ठेवतो. त्यामध्ये बॅक्टेरिया विकसित होतात. अशातच पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. जसे की, डायरिया, पोट दुखी आणि उलटी.

- Advertisement -

हेल्थ एक्सपर्ट्सच्या एका रिपोर्टनुसार भारतातील एका अनुमानानुसार 10-30 टक्के महिलांमध्ये शिळे खाणं खाल्ल्याने PCOS मुळे प्रभावित होत आहेत.

उपाय काय?
-विनेगरचा वापर करा
विनेगर भाज्या आणि फळं खराब होण्यापासून दूर ठेवते. विनेगरमध्ये बॅक्टेरिया किलिंग कॅपिसीटी होण्याच्या कारणास्तव भाज्या आणि फळांवर असलेला बॅक्टेरिया नष्ट होतात. याचा वापर करण्यासाठी एका कंटेनरमध्ये हलके गरम पाणी घ्या. त्यात एक झाकणं विनेगर टाका आणि फळ-भाज्या त्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर भाज्या पाण्याने स्वच्छ धुवून, पुसून फ्रिजमध्ये ठेवा.

- Advertisement -

-थंड ठिकाणी ठेवा
जेव्हा तुम्ही बाजारातून एखादे फळं किंवा भाजी खरेदी करता तेव्हा ती थंड ठिकाणी ठेवा. सर्वसामान्यपणे भाज्या आणि फळं आपण लगेच फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र ती दीर्घकाळ ताजी रहावीत म्हणून एका एअर टाइड कंटेनरमध्ये ठेवा.

-शिजलेले पदार्थ झाकून ठेवा
सर्वसामान्यपणे आपण शिजलेले पदार्थ दीर्घकाळ ताजे ठेवू शकत नाही. ते काही काळासाठीच ताजे राहू शकतात. बनवलेले पदार्थ ताजे ठेवण्यासाठी ते सीलबंद डब्ब्यात ठेवू नका.


हेही वाचा- रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ अनहेल्दी पदार्थांचे सेवन ठरू शकते घातक

- Advertisment -

Manini