लवकरच परीक्षेचा काळ सुरु होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील जवळ आल्या आहेत.परीक्षा जवळ आल्यावर मुलांमध्ये ताणतणाव देखील वाढू लागतो. परीक्षेची भीती वाटणे हे खूप साहजिकच आहे. परंतु वारंवार प्रत्येक परीक्षेची भीती वाटत असेल तर तुम्हाला मानसिक आणि शाररिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हा त्रास उद्भवू नये यासाठी तुम्ही वेळीच परीक्षेची तयारी सुरु करा. आज आपण जाणून घेऊयात, परीक्षेची तयारी कशी करायची.
वेळापत्रक बनवा
बोर्डाच्या परीक्षा किंवा इतर परीक्षा सुरु व्हायला आता एक महिना शिल्लक आहे. या दरम्यान बऱ्याचदा मुलांना कळतं नाही ? कोणत्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे कसं संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा अशावेळी तुम्ही एक वेळापत्रक बनवा. त्या वेळापत्रकानुसार अभ्यास करा कठीण विषयांना जास्त वेळ द्या. या वेळापत्रकामुळे तुम्हाला एक अंदाज येईल.
सराव करा
परीक्षेच्या आधी सर्व विषयांचा जास्ती जास्त सराव करा. पेपर सोडवा. पेपर सोडवल्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या वेळी अडचणी येणार नाही. तुमच्या कुठे चुका होतात, कोणत्या प्रश्नाकडे जास्त जोर द्याला पाहिजे याचा तुम्हाला अंदाज येईल.
विश्रांती करा
अभ्यास केल्यानंतर काही वेळ विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यासातून विश्रांती घेतल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. ताण देखील कमी होईल.
चांगली झोप
परीक्षा जवळ आल्यावर बरेच विद्यार्थी अभ्यासचा खूप ताण घेतात. या ताणतणावामुळे बऱ्याच मुलांना झोप लागत नाही. परीक्षेच्या वेळी झोप खूप महत्वाची असते. यामुळे तुम्ही रिलॅक्स होतात. त्यामुळे कमीतकमी ६ ते ७ तास झोपा.
ऑनलाईन लेक्चर्स
तुम्हाला काही अडचणी येत असल्यास ऑनलाईन लेक्चर्स ऐकू शकता. व्हिडिओज बघून नोट्स काढू शकता. यामुळे तुम्हाला विषय समजून घेण्यास मदत होईल.
अशाप्रकारे तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता.
हेही वाचा : Tips For Study : पार्टटाइम जॉब आणि कॉलेजमध्ये असा ठेवा बॅलन्स
Edited By : Prachi Manjrekar