आपल्याकडे नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, थालीपीठ हे पदार्थ सर्रास बनवले जातात तसेच दक्षिण भारतात डोसा, ईडलीबरोबरच अप्पे बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला भरपूर फायबर असलेल्या ओट्सचा पराठा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 1 कप ओट्स पावडर
- 1 कप गव्हाचे पीठ
- 2 कप पाणी
- 3 चमचे तेल
- 1 चमचा जिरे
- 1 कप बारीक चिरलेला कांदा
- 1 चमचा आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट
- 1 चमचा बारीक चिरलेला लसूण
- चवीनुसार मीठ
कृती :
- सर्वप्रथम आवश्यकतेनुसार पाणी वापरून ओट्स आणि गव्हाचे पीठ मऊ मळून घ्या. पीठाचे लहान-लहान गोळे तयार करा.
- दुसरीकडे स्टफिंग तयार करण्यासाठी, एका पॅनमध्ये ½ चमचा तेल गरम करा. त्यात जिरे घालून मध्यम आचेवर काही सेकंद भाजून घ्या.
- आता त्यात चिरलेल्या कांदा, आले-हिरवी मिरचीची पेस्ट आणि लसूण घाला. ते मध्यम आचेवर 2 मिनिटे भाजून घ्या.
- आता त्यात मीठ घालून चांगले मिसळा आणि मध्यम आचेवर 3 मिनिटे शिजवा. तयार सारण बाहेर काढून बाजूला ठेवा.
- आता पीठाचा प्रत्येक भाग लहान गोल आकारात लाटून घ्या आणि त्यात थोडेसे स्टफिंग ठेवा आणि हा पराठा लाटून घ्या.
- एक तवा गरम करा. प्रत्येक पराठा दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या. बाकीचे पराठे अशाच प्रकारे तयार करा.
- तयार पराठे गरमागरम दह्यासोबत सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा :
Amla Chutney : घरी बनवा झटपट आरोग्यदायी आवळ्याची चटणी
- Advertisement -
- Advertisement -