घरलाईफस्टाईलपिरियडमधील पोटदुखी? असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण

पिरियडमधील पोटदुखी? असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण

Subscribe

पिरियड्स म्हणजेच मासिक पाळी ही प्रत्येक महिलेसाठी महत्वाची असते. कारण याच नैसर्गिक चक्रावर तिचे मातृत्व अवलंबून असते.

पिरियड्स म्हणजेच मासिक पाळी ही प्रत्येक महिलेसाठी महत्वाची असते. कारण याच नैसर्गिक चक्रावर तिचे मातृत्व अवलंबून असते. यादिवसातली पोटदुखी ही सामान्य जरी असली तरी काहीजणींना यादिवसात असहय्य वेदना होतात. या वेदना सामान्य असल्याचे समजून अनेकजणी त्याकडे दुर्लक्ष करतात. पण अशा वेदना गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. यामुळे महिलांनी पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला तज्त्रांनी दिला आहे.

मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेकदा पोटदुखी बरोबरच पायाच्या तळव्यात पेटके येतात. याचबरोबर अनेक महिलांना ओटीपोटात, कंबरेत आणि पायांमध्ये वेदना होतात. आणि पाय प्रचंड दुखतात त्याला पीरियड्स क्रॅम्प्स असेही म्हणतात. ही वेदना साधारणपणे दोन ते तीन दिवस टिकते. त्यातच ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. पण या मासिक पाळीमध्ये ज्या स्त्रियांना खूप वेदना सहन कराव्या लागतात तेव्हा त्या गोळ्या घेतात. गोळ्यांमुळे वेदना बंद होत नाहीत. उलट गोळ्यांच्या अतिसेवनामुळे अधिक ब्लिडिंग होते. त्याचा थेट परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर होतो. अशावेळी,कोणत्याही प्रकारच्या गोळ्या न घेता सरळ डॉक्टर कडे जावे.

- Advertisement -

मासिक पाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल असेल तर ह्या गोष्टीं कडे लक्ष द्या-

१. फायब्रॉइड्सच्या गाठी असल्यास ट्यूमर होऊ शकतो. यामुळे गर्भाशयाच्या आतील भागावर ताण पडतो.

- Advertisement -

२. एंडोमेट्रिओसिसमध्ये,म्हणजेच गर्भाशयाच्या आतील भागात सूज येते त्यामुळे ती सूज गर्भाशयाच्या बाहेर पसरते आणि आसपासच्या अवयवांवर परिणाम करते यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने पथ्ये पाळावी.

३.या आजरामुळे शरीरात मोठ्याप्रमाणात अस्वस्था निर्माण होते. तसेच जास्त रक्तस्त्रावामुळे शरीर कुपोषित होऊन आजारी पडते. महिलांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊन प्रजनन शक्ती कमी होते आणि प्रेगन्सीसाठी त्याचा त्रास जास्त होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -