घरलाईफस्टाईलBeauty Tips: वाढतं वय लपवणं आहे शक्य! 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

Beauty Tips: वाढतं वय लपवणं आहे शक्य! ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

Subscribe

प्रत्येक महिलेला नितळ आणि चमकदार त्वचा हवीशी वाटत असते. यासोबतच तिचं वय जास्त असल्यास तिला देखील तिचं सौंदर्य चिरतरूण दिसावं असं वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला देखील तुमचं वाढतं वय चेहऱ्यावर दाखवायचं नसेल तर करा या सोप्या टीप्सना फॉलो. धावपळीचे जीवन जगत असताना चुकीच्या खाण्याच्या सवयी, हार्मोनल बदल, सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे आणि धूम्रपान यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्व किंवा वय अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकाळ सुंदर आणि तरूण दिसायचे असेल तर यासाठी स्वतःला काही सवयी लावणं आवश्यक आहे. भरपूर पाणी प्या, हिरव्या भाज्यांसोबत फळे खा. तसेच जास्त मीठ आणि साखरेचे सेवन करणं टाळा. पण त्याचबरोबर इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या.

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम करणं ही सवय तुम्हाला तरुण ठेवण्यास मदत करते. सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार, व्यायामासाठी 45-50 मिनिटे नक्कीच काढा यादरम्यान कार्डिओ किंवा योगा करा. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागात रक्ताचे योग्य परिसंचरण होते. या व्यतिरिक्त, सतत्याने सूर्याच्या संपर्कात राहिल्याने, त्वचा खराब होऊ लागते आणि वाढतं वय दिसू लागते. त्यामुळे हे टाळण्यासाठी सनस्क्रीन नक्की लावा. जे UVA आणि UVB दोन्हीच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करेल.

- Advertisement -

ताण-तणावापासून दूर रहा

घरात किंवा नोकरीला असाल तर लहानशा गोष्टींबद्दल ताण-तणाव घेण्याची सवय सोडा. कारण त्याचा केवळ आरोग्यावरच नव्हे तर त्वचेवरही गंभीर परिणाम होतो. तणावामुळे झोप नीट पूर्ण होत नसल्याने पचनक्रियेसह चेहऱ्यावर सुरकुत्या आणि नंतर मुरुमांची समस्या निर्माण होते. त्वचा तेजस्वी दिसण्याचे काम फक्त पूरेशी झोप करू शकते. म्हणून 7-8 तासांची झोप आवश्यक आहे. तणाव दूर करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन,योगाची मदत घेऊ शकता.

गाजर आणि बीट ज्यूस प्या

बीटरूटमध्ये पोषक घट असल्याने बीटचा रस तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. बीटरूट आणि गाजरचा रस शरीराला डिटॉक्सिफाय करतो, कारण बीटरूटमध्ये बीटाईन असते जे यकृताचे आरोग्य सुधारते. गाजर शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. बीटरूट आणि गाजर दोन्ही सुपरफूड आहेत जे आपल्या शरीरातील दाह कमी करतात. हा रस ब्लड सर्कुलेशन सुधारतो, आणि जीवनसत्त्वे A आणि C चा समृद्ध स्त्रोत असल्याने तुमची त्वचा चमकदार बनते.

- Advertisement -

या टीप्स देखील करा फॉलो

  • तेलकट, मसालेदार, गरम पदार्थांचा आहारातून पूर्णपणे समावेश काढून टाका.
  • गोड पदार्थ वृद्धत्वाची प्रक्रिया वाढवण्याचे काम करतात, म्हणून त्याही खाणे टाळा.
  • खाण्यापिण्यापासून ते झोपेपर्यंत आणि उठण्यापर्यंत वेळ ठरवा आणि त्याचे नियमित पालन करा. योग्य आहार आणि चांगली झोप बऱ्याच प्रमाणात वाढतं वय रोखण्यासाठी प्रभावी आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -