Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealth'या' उपायाने थांबवा तोंडाला येणारी दुर्गंधी

‘या’ उपायाने थांबवा तोंडाला येणारी दुर्गंधी

Subscribe

तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे अनेकजण त्रस्त असतात. बऱ्याचदा तोंडाला वास येऊ नये म्हणून वेलची, बडीशेप याचे सेवन केले जाते. मात्र, काहींच्या तोंडाला तरीही सतत दुर्गंधी येते. यामुळे व्यक्तीगत आरोग्यासह दैनंदिन जगण्यातही अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यावर काही सोप्पे उपाय सांगणार आहोत.

तोंडाला येणारी दुर्गंधी अशी थांबवा

  • ग्रीन टी

What green tea can do for you? – Derma Essentia

- Advertisement -

ग्रीन टीमध्ये फ्लॅवोनाईड्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते. दालचिनी घातलेला चहा आपले तोंड आणि श्वास ताजा ठेवतो.

  • पाणी

15 benefits of drinking water and other water facts

- Advertisement -

तोंडाची दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी पाण्यासारखा दुसरा कोणता उपाय नाही. कोणताही पदार्थ खाल्यानंतर खळखळून चूळ भरावी. यामुळे दातात अडलेले काही कण निघून जातात आणि तोंड स्वच्छ होते. त्यामुळे पाण्याने चूळ भरुन सातत्याने पाण्याचे सेवन करावे. यामुळे तोंडातील जीवाणू नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे सातत्याने पाण्याचे सेवन करावे.

  • संत्री, लिंबूचे सेवन

Woman in Real Life: Dried Orange & Lemon Garland Tutorial - How To Dry Fruit For Christmas Decor

संत्री, लिंबू अशा आंबट फळांमध्ये अँटिऑक्सिडंटही असते. तसेच या फळांमध्ये असलेले व्हिटॅमीन-सी जीवाणूंना नष्ट करते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक कमी होण्यास त्याची मदत होते. ही फळे तुम्ही खाऊ शकता.

मसाले आणि हर्ब्स
Storing herbs and spices with the right humidity
वेलची, बडीशेप, दालचिनी, लवंग यांसारखे मसाले आणि पुदिना, कोथिंबीर, निलगिर यांसारख्या वनस्पतींचा वापराने तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. निलगिरी आणि वेलचीत सिनेऑल नावाचा घटक असतो. सिनेऑल तोंडातील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश करते आणि आपल्याला तोंड स्वच्छ आणि फ्रेश झाल्यासारखे वाटते.

  • दही

Food for Thought: A Short History of Yogurt - BC Dairy

दह्यासारखे पदार्थ तोंडातील हायड्रोजन सल्फाईडला नष्ट करतात. दात आणि हिरड्यांच्या समस्या दूर होण्यास त्यामुळे मदत होते.


हेही वाचा :

‘हे’ पदार्थ सतत गरम केल्यास होतात विषारी

- Advertisment -

Manini