Tuesday, March 18, 2025
HomeमानिनीKitchen Tips : उन्हाळ्यात बटाटे असे करा स्टोर

Kitchen Tips : उन्हाळ्यात बटाटे असे करा स्टोर

Subscribe

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे बरेच पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच, अन्नपदार्थ खराब होण्याची समस्या सर्वाधिक वाढू लागते. त्यामुळे या ऋतूत अन्नपदार्थांची विशेष काळजी घ्यावी लागते. योग्यवेळी काळजी घेतली नाहीतर ते लवकर खराब होण्यास सुरुवात होतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे बटाटा. जे आपण रोज स्वयंपाकघरात वापरतो. उन्हाळा सुरू होताच बटाटे सहजपणे खराब होतात. अति उष्णतेमुळे बटाटे केवळ खराब होत नाहीत तर त्यांना अंकुर फुटू लागतात. असे बटाटे आपण जेवणासाठी वापर नाही. उन्हाळ्यात ही खूप सामान्य समस्या आहे तर आज आपण या लेखातून जाणून घेऊयात उन्हाळ्यात बटाटे कसे स्टोर करायचे.

बटाटे कागदावर ठेवा

जर तुम्ही उन्हाळ्यात खूप बटाटे विकत घेतले असतील तर त्यांच्यासाठी एक मोठी टोपली घ्या. त्या वर्तमानपत्र किंवा कागदावर बटाटे पसरवून ठेवा. असे केल्याने, कागद बटाट्यांमधील ओलावा शोषून घेतो आणि बटाटे खराब देखील होत नाही.

लसूणसह ठेवा बटाटे

जेव्हा बटाटे तुम्ही स्टोर करतात तेव्हा त्या लसूणच्या पाकळ्या जवळ ठेवा.असे केल्याने बटाटे उन्हाळ्यात कधीही कुजणार नाहीत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही संपूर्ण लसूण देखील ठेवू शकता.

एसी असलेल्या रूममध्ये ठेवा बटाटे

उन्हाळ्यात बटाटे नेहमी एसी असलेल्या रूममध्ये स्टोर करा. एसी असलेली खोली थंड राहते आणि त्यामुळे बटाटे लवकर खराब होत नाहीत.

सफरचंदांसह बटाटे ठेवा

उन्हाळ्यात उष्णतेमुळे बटाट्यांना लवकर अंकुरू लागतात. अशावेळी बटाटे ठेवलेल्या ठिकाणी 2 ते 3 सफरचंद ठेवा. सफरचंदातून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे बटाट्यांना अंकुरू लागत नाही. ज्यामुळे ते बराच काळ ताजे राहतात.

हेही वाचा : Kitchen Tips : या टिप्सच्या मदतीने घरीच बनवा कॅटरर्स सारखं जेवण


Edited By : Prachi Manjrekar

 

Manini