Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health स्ट्रेस हार्मोन कोर्टीसोल कमी करण्याचे 'हे' तीन उपाय

स्ट्रेस हार्मोन कोर्टीसोल कमी करण्याचे ‘हे’ तीन उपाय

Subscribe

आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा तणावाखाली असतो. तणाव आपल्याला आरोग्याला कोणत्या ना कोणत्या रुपात नुकसान पोहचवतो. अज्ञातपणे आपण कोणत्या ना कोणत्या स्ट्रेस मध्ये असतो. शरिरात जेव्हा स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल वाढतो तेव्हा आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होते. शरिराला उत्तम फंक्शन करण्यासाठी हार्मोन्स बॅलेन्स असणे फार गरजेचे असते. हार्मोन असंतुलित झाल्यास याचे लक्षण स्पष्टपणे दिसून येतात. खासकरुन आपण जर स्ट्रेस हार्मोनचा विचार केला तर यामुळे ब्लड प्रेशर, हृदयासंबंधित आजार आणि आणखी काही समस्या सुद्धा उद्भवू शकतात. शरिरात हॅप्पी हार्मोन्सचे अधिक उत्सर्जन झाल्यानंतर याचा आरोग्यावर उत्तम परिणाम होतो. (Stress hormone cortisol control tips)

स्ट्रेस हार्मोन अधिक झाल्याने आपल्या शरिरातील इम्युन सिस्टिमवर प्रभाव पडतो. यामुळेच आपण आजारी पडू शकतो. त्यामुळे ते नियंत्रणात राहणे फार गरजेचे असते. स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलला कमी करण्यासाठी तुम्ही पुढील काही टीप्स वापरु शकता.

- Advertisement -

दररोज व्यायाम करावा
आपल्या शारिरीक आणि मानसिक हेल्थचा एकमेकांशी थेट संबंध आहे. व्यायामुळे आपले शरिर आणि मेंदूवर पॉझिटिव्ह परिणाम होतो. जर तुमच्या शरिरात स्ट्रेस हार्मोन अधिक असतील तर तुम्ही स्वत: अधिक तणावाखाली असल्याचे अनुभवता. त्यामुळे दररोज 30 मिनिटे तरी व्यायाम जरुर करा. कार्डिओ एक्सरसाइज, योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रभावशाली आहे. हलकी-फुल्की एक्सरसाइज सुरुवातीला करा आणि त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार एक्सरसाइजवर अधिक जोर देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यामधील स्ट्रेल लेवल कमी होईल.

- Advertisement -

स्ट्रेस मॅनेजमेंट करा
स्ट्रेसला दूर करण्यासाठी तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटच्या पर्यायांचा वापर तुमच्या डेली रुटीनमध्ये करु शकता. ब्रिदींग एक्सरसाइज, मेडिटेशन, प्राणायम आणि अन्य काही प्रकारच्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही स्ट्रेस हार्मोन कमी करु शकता. जेव्हा तुम्ही अधिक तणावाखाली असाल तेव्हा असे काही करा ज्यामुळे तुम्हाला अधिक आनंद मिळेल. कोर्टिसोलचा स्तर कमी करण्यासाठी असे करणे फार गरजेचे आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट संबंधित अशा काही पर्यायांचा वापर करुन तु्म्ही नक्कीच स्ट्रेसचा स्तर कमी करुन कोर्टिसोलचा स्तर ही कमी करु शकता. (Stress hormone cortisol control tips)

पुरेशी झोप घ्या
धावपळीच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचे म्हणजे पुरेशी झोप. ती पूर्ण झाली नसेल तर संपूर्ण दिवसभर थकवा जाणवतो. झोप ही कोर्टिसोलचा स्तर रेग्युलेट करण्यासाठी फार महत्वाची भुमिका पार पाडते. दररोज 7-9 तासांची झोप घ्या. आपल्या बेडटाइम रुटीनला वारंवार बदलू नका. झोपण्यापूर्वी काही वेळाआधी मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींपासून दूर रहा.

या गोष्टींची घ्या काळजी
या गोष्टींसह हे सुद्धा पहा की, नक्की कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला तणावासारखे वाटत आहे. एकेटे राहण्याऐवजी आपल्या समस्या मित्रमैत्रिणींसोबत त्या शेअर करा. या व्यतिरिक्त हेल्दी आहार आणि लाइफस्टाइल ही फॉलो करा.


हेही वाचा- उभं राहून पाणी पिणे म्हणजे ‘या’ आजारांचा धोका

- Advertisment -

Manini