धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकजण ताण तणाव घेऊन वावरत असतो. जर तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला नेहमी नित्यक्रमाचं पालन करावं लागेल. अनेक आरोग्यतज्ञ सांगतात की सकाळच्या सवयी या मेंटल हेल्थसाठी फार महत्त्वाच्या ठरतात. तुमचं सकाळी उठल्यानंतर काय रुटीन आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मानसिक आरोग्य तणावमुक्त ठेवायचं असेल तर या टिप्स फॉलो करा.
एकांत गरजेचा
सकाळी उठल्यावर एकांत अतिशय गरजेचा असतो. यावेळेत तुम्ही कुणाशीही न बोलता शांत चित्ताने बसावं. योगा करू शकता, ओम मंत्रोच्चार करू शकता ज्याने तुमचं मन आणि डोकं शांत राहील. सकाळी-सकाळी एकांत लाभल्यास दिवस चांगला जातो.
व्यायाम करा
व्यायामामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर फ्रेश, टवटवीत, आनंदी वाटते. सकाळी 30 मिनिटे व्यायाम केल्यामुळे शारिरीक-मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. व्यायामामुळे इंडोर्फिन्स हार्मोन्स सक्रिय होते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.
स्वतःला वेळ द्या
सकाळी खूप धावपळ असते. सकाळी जितक्या वाजता उठायचंय त्याच्या 15 मिनिटं आधीचा अलॉर्म लावून झोपा. त्यामुळे सकाळी उठून स्ट्रेचिंग करायला, स्वतःला वेळ द्यायला वेळ मिळेल. धावपळ होणार नाही. स्वतःसाठी 10/15 मिनिटे दिल्यास शांती व समाधान लाभेल. तुमच्या आवडीचे संगीत ऐका. पुस्तक वाचा. पण दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ जरुर द्या.
मालिश
आयुर्वेदामध्ये असा उल्लेख आढळतो की, जर तुम्ही अनेक दिवसांपासून तणावाखाली असालं तर तुम्हाला तुमच्या दिनचर्येत मालिशचा नक्की समावेश केला पाहिजे. तणावाखाली असताना तिळाच्या तेलाने मालिश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. डोक्यावर मालिश करण्यासाठी आवळ्याच्या किंवा बदामाच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकता. मालिशमुले तुमच्या शरीराला खूपच आराम मिळेल.
चरबी वाढविणाऱ्या पदार्थांपासून दूर राहा
शरीरात वात दोष असेल तरीसुद्धा सतत ताण-तणाव निर्माण होतं असतो. त्यामुळे शरीरात चरबी म्हणजेच वात वाढविणाऱ्या जंक फूड पासून स्वतः ला दूर ठेवा. तुम्हाला तणावापासून मुक्ती हवी असेल तर तुमच्या रोजच्या आहारात आवळा, अश्वगंधा, ब्राह्मी या आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश करा.
हेही वाचा : Health Tips : खाल्ल्यानंतरही भूक लागते ? ही असू शकतात कारणे
Edited By : Nikita Shinde