Sunday, February 25, 2024
घरमानिनीलिफ्टमध्ये अडकलात, करा 'हे' काम

लिफ्टमध्ये अडकलात, करा ‘हे’ काम

Subscribe

शहरातील उंचच उंच इमारतींमध्ये लिफ्ट ही असतेच. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करण्यात येतो. ऑफिसमध्ये किंवा मॉल्समध्ये लिफ्ट वापरणे सामान्य बाब झाली आहे. याशिवाय लिफ्टच्या वापराने वेळ तर वाचतोच शिवाय मेहनतही लागत नाही. पण, अनेकदा लिफ्टमध्ये अडकल्याचा अनुभव कित्येक जणांना येतो आणि अशावेळी लोक पॅनिक होतात.

लिफ्टमध्ये अडकणे खरच त्रासदायक असू शकते. हा अनुभव अनेकांना भीतीदायक ठरू शकतो. लिफ्टमध्ये अडकल्यावर घाबरून जाण्याऐवजी मनावर ताबा मिळवत या समस्येतून बाहेर निघण्याचा प्रयन्त करा.

- Advertisement -

शांत राहा, पॅनिक होऊ नका –
तुम्ही जर लिफ्टमध्ये अडकले असला तर आरडा-ओरडा करण्याऐवजी थोडा वेळ शांत राहण्याचा प्रयन्त करा. शांत राहिल्याने तुम्हाला मानसिक स्ट्रेस येणार नाही. अशाने तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यास कोणतीही अडचण जाणवणार नाही. याशिवाय तुम्ही दीर्घ श्वास घेण्याचा प्रयन्त करा.

लाईट शोधा –
जर तुम्ही लिफ्टमध्ये अडकले असाल आणि लिफ्टमधील लाईट्स बंद असतील तर सर्वप्रथम लाईट्स शोधा. लिफ्टमध्ये लाईट्स नसतील तर अशावेळी तुम्ही मोबाईल टॉर्चचा वापर करू शकता. अनेकांना अंधाराची भीती असते अशावेळी हा हॅक तुम्हाला उपयोगी पडेल. बऱ्याच वेळा लिफ्टच्या आतही मोबाईलमध्ये नेटवर्क असते. अशावेळी मदतीसाठी कोणाला तरी कॉल करा. लिफ्टमध्ये इतरही लोक असतील तर ते तुमच्या पासून अंतर राखत आहेत की, नाही ते चेक करा. अशा परिस्थितीत अनुचित घटना घडू शकते. एकटे लिफ्टमध्ये अडकले असला तर मोबाइल बॅटरी जपून वापरा.

- Advertisement -

अलार्म बटण किंवा कॉल बटण दाबा –
लिफ्टमध्ये ही दोन्ही बटणे असतात. अलार्म बटण हे लिफ्टमध्ये कोणीतरी अडकल्यावर आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे यासाठी असते. जर आवाज देऊनही मदत मिळत नसेल तर अलार्म बटण दाबा. कॉल बटण हे सुरक्षेसाठी असते आणि ते दाबल्याने तुम्हाला तंत्रन्यांशी संपर्क साधून मदत होऊ शकते.

लिफ्टमधील सर्व बटणे दाबा –
लिफ्टमधील इमरजन्सी बटन काम करत नसेल तर अशा वेळी सगळी बटणे दाबा. याने अलर्ट कॉल जातो आणि तुम्हला मदत मिळू शकेल.

 

 


हेही वाचा; आउटिंगसाठी फ्रेश हवेच्या ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

 

- Advertisment -

Manini