अनेक मध्यमवर्गातील मुलांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. परंतु नीटशी माहिती न मिळाल्यामुळे किंवा आर्थिक समस्यांमुळे त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहते. मात्र आता याबद्दल फारशी काळजी करण्याचे कारण नाही. जर तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. जाणून घेऊयात या संधीविषयी.
ग्लासगो, यूके मध्ये असलेले स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठ येथे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहे. 2025-2026 या शैक्षणिक वर्षात विज्ञान विद्याशाखेत पदवीपूर्व पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती दिल्या जातील. ही शिष्यवृत्ती 5000 ते 7000 पौंड (5.63 लाख ते 7.88 लाख रुपये) पर्यंत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही शिष्यवृत्ती मिळवून भारतीय विद्यार्थी ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न देखील पूर्ण करू शकतात.
ही शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल ज्यांनी स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केला आहे आणि त्यांना संस्थेने प्रवेश दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी उत्कृष्ट आहे त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त केलेले उपक्रम किंवा व्यावसायिक अनुभव लक्षात घेऊन शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 31 जुलैपर्यंत या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येऊ शकतो.
कोणत्या विषयांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध असेल?
या शिष्यवृत्ती रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, गणित आणि स्टॅटिस्टिक्स, फार्मसी आणि बायोमेडिकल सायन्सेस, भौतिकशास्त्र, फॉरेन्सिक सायन्स, बायोकेमिस्ट्री, बायोलॉजी आणि बायोलॉजिकल सायन्सेस, बायोमेडिकल सायन्स, इम्युनोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि फार्माकोलॉजी या विषयांसाठी आहेत. जर तुम्ही यापैकी कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात अर्ज केला असेल आणि तुम्हाला प्रवेश मिळाला असेल, तर तुमचे नाव शिष्यवृत्तीसाठी देखील विचारात घेतले जाऊ शकते.
शिष्यवृत्तीसाठी कोणत्या अटी आहेत?
शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी, तुम्हाला स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठात 2025-2026 सत्रासाठी विज्ञान विद्याशाखेतील कोणत्याही पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागेल. तुम्ही पहिल्या वर्षाला किंवा दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता. मात्र तुम्ही पूर्ण फी भरली पाहिजे. तुमचा आतापर्यंतचा शैक्षणिक रेकॉर्ड उत्कृष्ट असला पाहिजे. जर तुम्हाला कोणत्याही सरकार किंवा दूतावासाकडून पूर्ण शिष्यवृत्ती मिळत असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरू शकत नाही.
‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर शिष्यवृत्ती दिली जाईल. म्हणून विद्यार्थ्यांना लवकर अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. चांगली शैक्षणिक कामगिरी आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमुळे शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता वाढू शकते. या शिष्यवृत्तीमुळे परदेशात शिक्षण घेण्याची उत्तम संधी तुम्हाला मिळू शकते.
हेही वाचा : Friendship Goals : आयुष्य कूल ठेवण्यासाठी हे मित्र हवेच
Edited By – Tanvi Gundaye