टीना दत्ता ही टीव्हीवरील हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यापासून तिने तिच्या अभिनयाला सुरुवात केली. अनेक हिट मालिकांमधून चाहत्यांची मने जिंकली. याशिवाय टीना अनेक रिअॅलिटी शोचा देखील भाग होती. टीना दत्ता तिच्या पडद्यावरच्या अभिनयाने आणि तिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. टिनाचे प्रत्येक ऑउटफिट खूप सुंदर आणि परिपूर्ण असतात. जर तुम्हाला पार्टीला जायचं असेल तर टिनाचे ऑउटफिट तुम्ही ट्राय करू शकता. आज आपण जाणून घेउयात टीना दत्ताचे कोणते बेस्ट ड्रेस आपण ट्राय करू शकतो.
शॉर्ट बॉडीकाॅन ड्रेस
महिला दिनाच्या खास पार्टीसाठी हा शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस घालू शकता. हा ड्रेस घालून तुम्ही पार्टीमध्ये खूप हटके दिसू शकता. तसेच यासह लांब बूट, सुंदर अशी हेअर स्टाइल तुमचा लूक परिपूर्ण बनवतील. या ड्रेसमध्ये तुम्ही मेकअप मिनिमल ठेवू शकता.
फिश कट गाउन
हल्ली असे गाऊन खूप ट्रेंडमध्ये आहेत. या गाउनमध्ये तुम्हाला अनेक पर्याय सहजपणे मिळतील. टीना दत्ताप्रमाणे तुम्ही हा सुंदर गाउन स्टाइल करू शकता. या गाउनसह तुम्ही स्टायलिश हिल्स किंवा स्टेटमेंट ज्वेलरी पेअर करू शकता. बन हेअर स्टाइल करू शकता. फंकी मेकअप करू शकता. या ड्रेससह लाल लिपस्टिक देखील सुंदर वाटेल.
फ्रॉक स्टाइल ड्रेस
जर तुम्हाला रेड ड्रेस आवडत असेल तर तुम्ही हा फ्रॉक स्टाइल ड्रेस निश्चितपणे घालू शकता. या ड्रेससह तुम्ही स्मोकी आयमेक देखील करू शकता. यासह तुम्ही फंकी इयररिंग्स देखील स्टाइल करू शकता. तसेच सिल्वर पेंडेंट देखील कॅरी करू शकता. पोनी हेअर स्टाइलमुळे तुम्हाला एक स्टाइलिश लूक मिळेल. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही यावर जॅकेट देखील घेऊ शकता.
हेही वाचा : Fashion Tips : स्टायलिश कॉर्ड सेट
Edited By : Prachi Manjrekar