Saturday, March 22, 2025
HomeमानिनीFashion Tips : पार्टीला स्टाइल करा जन्नत जुबेरचे बेस्ट ड्रेसेस

Fashion Tips : पार्टीला स्टाइल करा जन्नत जुबेरचे बेस्ट ड्रेसेस

Subscribe

जन्नत जुबेरने तिच्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली. ती एक लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिने 2010 मध्ये “दिल मिल गये” या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आता ती तिच्या अभिनयासह तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. बरेच लोक तिला तिच्या फॅशनमुळे देखील फॉलो करतात. आज आपण जन्नत जुबेरचे कोणते बेस्ट ड्रेस आपण पार्टीत घालू शकतो ते जाणून घेऊयात.

गोल्डन बॉर्डर वर्क साडी लूक

तुम्ही सुंदर दिसण्यासाठी जन्नत जुबेरची ही गोल्डन बॉर्डर असलेली साडी नेसू शकता. तुम्ही जन्नत जुबेर प्रमाणे तुमचा लूक रिक्रिएट करू शकता. तुम्ही अशा प्रकारची साडी नेसून तुमचा लूक परिपूर्ण बनवू शकता. तुम्ही या हलक्या कपड्यांमध्ये देखील चांगले दिसाल. या साडीसह दागिने आणि मेकअपचा लूक साधा ठेवू शकता.

अनारकली सूट लूक

जर तुम्हाला फ्लोरल सूट घालायला आवडत असेल तर तुम्ही जन्नतचा हा लूक निश्चितपणे ट्राय करू शकता. या अनारकली सूटमध्ये तिने खूप सुंदर लूक स्टाइल केला आहे. या ड्रेससह तुम्ही दुपट्ट्यावर पातळ बॉर्डर असलेली ओढणी घेऊ शकता. पार्टीसाठी किंवा लग्नासाठी हा ड्रेस उत्तम आहे.

सिम्पल व्हाइट कुर्ता

जर तुम्हाला सिम्पल आणि सुंदर लूक पाहिजे असेल तर तुम्ही हा सिम्पल व्हाइट कुर्ता ट्राय करू शकता. यासह तुम्ही सुंदर बांगड्या घालू शकता. हा कुर्ता एका साध्या डिझाइनसह तयार केला गेला आहे. तसेच, जास्त मेकअप आणि सुंदर हेअरस्टाइल करून तुम्ही तुमचा लूक रिक्रिएट करू शकता. हा कुर्ता तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळेल. या कुर्त्यामध्ये तुम्हाला असंख्य प्रकार आणि रंग देखील मिळतील.

लेमन ड्रेस

हल्ली लेमन ड्रेस खूप ट्रेंडमध्ये हा ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. तुम्ही जन्नत जुबेर प्रमाणे हा ड्रेस स्टाइल करू शकता. तुम्ही या ड्रेसवर कर्ल्स करू शकता आणि मिनिमल लूक करून तुमचा लूक परफेक्ट बनवू शकता.

हेही वाचा : Fashion Tips : स्लिम गर्ल्ससाठी कियारा अडवानीच्या या साड्या बेस्ट


Edited By : Prachi Manjrekar

Manini