व्हॅलेंटाइन वीक हा प्रत्येक जोडप्यांसाठी खूप खास असतो. हा दिवस खास बनवण्यासाठी अनेक जोडपे एकमेकांसाठी विविध गोष्टी करत असतात. व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात रोझ डे पासून होते. या दिवशी सुंदर दिसण्यासाठी आऊटफिटसह ज्वेलरी देखील महत्वाचा भाग आहे. तर आज आपण जाणून घेऊयात आऊटफिटसह कोणत्या प्रकारची ज्वेलरी आपण स्टाइल करू शकतो.
रोझ थीमवरील ज्वेलरी
जर तुम्ही प्रत्येक थीम फॉलो करत असाल तर तुम्ही या दिवशी गुलाबाच्या डिझाईनची ज्वेलरी स्टाइल करू शकता. तुम्हाला ही ज्वेलरी अनेक ठिकाणी मिळेल किंवा तुम्ही ऑनलाइन देखील ही ज्वेलरी ऑर्डर करू शकता.
गुलाबाच्या आकाराचे कानातले
गुलाबाच्या डिझाईनचा पेंडंट किंवा नेकलेससह तुम्ही कानातले देखील स्टाइल करू शकता. तुम्हाला नेकलेसच्या सेटसह देखील हे कानातले मिळतील. मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन देखील मिळतील.
एलिगंट ज्वेलरी
जर तुम्हाला सॉफ्ट आणि एलिगंट लूक हवा असेल, तर हलकी आणि नाजूक ज्वेलरी चांगली दिसेल. या ज्वेलरीमुळे तुम्हाला एलिगंट लूक मिळेल.
पर्ल किंवा डायमंड ज्वेलरी
सिंपल हार्ट शेप पेंडंट किंवा डेलिकेट गोल्ड चेन आणि ब्रेसलेट खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल.
स्टेटमेंट ज्वेलरी
हल्ली बऱ्याच तरुणींना स्टेटमेंट ज्वेलरी घालायला खूप आवडते. या ज्वेलरी खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. या ज्वेलरीमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार आणि रंग मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ज्वेलरीला स्टाइल करू शकता.
लेयरिंग ज्वेलरी
लेयरिंग ज्वेलरी खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. या ज्वेलरी स्टाइल केल्याने तुम्हाला एक स्टयलिश लूक मिळेल. या ज्वेलरीमध्ये तुम्हाला अनेक सुंदर डिझाइन्स सहजपणे मिळतील.
कस्टमाइज्ड ज्वेलरी

तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमच्या नावाचे किंवा इनिशियल्स असलेले ब्रेसलेट नेकलेस किंवा लहान लॉकट ज्यामध्ये फोटो ठेवता येईल हे रोझ डे साठी उत्तम भेटवस्तू आहे.
हेही वाचा : Valentine Day Fashion Tips : व्हॅलेंटाइन डे ला हे रेड ड्रेस बेस्ट
Edited By : Prachi Manjrekar