Friday, January 24, 2025
HomeमानिनीMakar Sankranti 2025 : मकरसंक्रांतीसाठी काळ्या साड्यांचे स्टयलिश ट्रेंड्स

Makar Sankranti 2025 : मकरसंक्रांतीसाठी काळ्या साड्यांचे स्टयलिश ट्रेंड्स

Subscribe

मकरसंक्रांत काळया साडीशिवाय अपूर्ण आहे. मकरसंक्रांतीला काळी साडी नेसण्याची परंपरा खूप जुनी आहे. तसेच या काळ्या रंगाच्या साडीला या दिवशी विशेष महत्व दिले जाते. फॅशन आणि ट्रेंडमध्ये वारंवार बदल होत असल्यामुळे आपल्याला दरवर्षी मकरसंक्रांतीला साड्यांच्या डिझाईन्सचे वेगवेगळे ट्रेंड्स आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपण त्याच साड्या नसतो त्यामुळे काही नावीन्य राहत नाही. हल्ली काळ्या साड्यांमध्ये अनेक सुंदर आणि स्टयलिश ट्रेंड्स आले आहेत. आज आपण जाणून घेऊयात, मकरसंक्रांतीसाठी साड्यांचे काही स्टयलिश ट्रेंड्स

पैठणी साडी

प्रत्येक महिलेला पैठणी साडी नेसायला खूप आवडते. पैठणीमध्ये सुद्धा तुम्हाला आता अनेक डिझाइन्स ,पॅटर्न्स सहजपणे मिळतील. काळी पैठणी सुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. दागिन्यांसह तुमचा लूक परिपूर्ण करू शकता.

काळी ऑर्गेंझा साडी

ऑर्गेंझा साड्या खूप हलक्या आणि एलीगंट असतात.मकरसंक्रांतीसाठी या साड्या उत्तम आहेत.

सिल्क साडी

बऱ्याच तरुणींना सिल्क साडया नेसायला खूप आवडतात. या साड्या खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. तुम्ही यावर्षी मकरसंक्रांतीला सिल्कची साडी नेसू शकता.

शिफॉन किंवा जॉर्जेट साडी

शिफॉन किंवा जॉर्जेट साडी ही त्याच्या हलक्या मटेरियलमुळे ही साडी खूप स्टायलिश दिसते. तुम्ही या साडीवर सिल्वर किंवा गोल्डन ब्लाउज पेअर करू शकता.

खणाची साडी

गेल्या काही वर्षांपासून खणाच्या साडीचा ट्रेंड दिसून येतो आहे.खणाच्या साडीमुळे एक वेगळाच रॉयल लूक येतो आणि याशिवाय पारंपरिक लूकमध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

नेट साडी

बऱ्याच तरुणींना नेटची साडी नेसायला खूप आवडते. ही साडी खूप स्टायलिश दिसते. या साडीचा ट्रेंड कधीही जुना होत नाही. या साडीमध्ये तुम्हाला काळ्या रंगामध्ये अनेक नेटच्या सुंदर डिझाइन्स आणि पॅटर्न्स पाहायला मिळतील.

हेही वाचा : Fashion Tips : टर्टलनेक ब्लाउजचा नवा ट्रेंड


Edited By : Prachi Manjrekar

Manini