Friday, April 19, 2024
घरमानिनीSuccess Tips- या सवयी टाळा, यश मिळवा

Success Tips- या सवयी टाळा, यश मिळवा

Subscribe

कुठल्याही कामात यश हव असेल तर कष्ट हे आलंच. पण बऱ्याच जणांना दिवसरात्र कष्ट करूनही अपेक्षित य़श मिळत नाही. अशावेळी काहीजण आपल्या या अपयशाचे खापर नशिबावर फोडून मोकळे होतात. पण तज्त्रांच्या मते खरं तर त्यांचे प्रयत्नच कुठेतरी कमी पडलेले असतात किंवा त्यांनी ध्येय गाठण्यासाठी निवडलेला मार्गच चुकीचा असतो. त्यात शिस्त नसते. आळस, धरसोड वृत्ती, अज्ञान, चुकीचे मार्गदर्शन अशी अनेक कारणे या अपयशासाठी कारणीभूत असतात. पण हे सर्व टाळायचे असेल तर य पुढे दिलेल्या ७ गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

परफेक्शनच्या मागे धावणे-परफेक्शनच्या मागे धावणे म्हणजे आपण जे काही काम करू ते परफेक्टच व्हायला हवे. असा अट्टाहास बाळगणे. खंर तर वाचायला आणि ऐकायला बरं वाटतं. कारण प्रत्यक्ष आयुष्यात परफेक्ट कोणीच नसतो. त्यात वस्तू किंवा व्यक्ती यांचाही समावेश आहे. पण काहीजण आपण जे काम करू ते १०० टक्के परफेक्टच झालं पाहीजे याचा इतका उहापोह करतात की या परफेकश्नच्या मागे धावताना अनेक संधी दवडून टाकतात. यामुळे परफेकश्नचा अट्टाहास टाळता यायला हवा.

- Advertisement -

भीती-कुठलेही काम करताना त्याला आत्मविश्वासाची जोड आवश्यक असते. तसेच नवीन काम करताना रिस्क घ्यावी लागते. धाडसी निर्णय घ्यावे लागतात. पण काहीजणांचा स्वभावच इतका घाबरट असतो की ते आव्हान पेलायलाच तयार नसतात. त्यामुळे त्यांच्या मनात सतत यशाची धास्ती असते. परिणामी त्यांच्या याच भीतीमुळे ते निर्णय घेताना गोंधळतात आणि या गडबडीत चुकीचे निर्णय घेतले जातात. यामुळे आव्हानांची भीती न बाळगता व्यवसायात कामात नवीन प्रयोग करता यायला हवेत.

स्पष्टता नसणे- यशाच्या आड येणारा मोठा अडथळा म्हणजे मानवी स्वभाव. जो विविध विचारांच्या जाळ्यात सतत अडकत असतो. आपल्यापैकी अनेकजण याच्या जाळ्यात अडकतात. यामुळे आपण जे काम हाती घेतले आहे ते का घेतले आहे त्याचा उ्द्धेश काय याचाच अनेकांना विसर पडतो.त्यातून मग कामात गोंधळ सुरू होतो. यातून कामाचा बट्टयाबोळ होतो. कंपनी असेल तर ती घाटयात जाते. कारण कामात अडथळे आले तर त्यातून मार्ग कसा काढायचा हेच ठाऊक नसते.यामुळे कुठलेही काम हाती घेण्याआधी स्वतला स्पष्ट विचारावं की आपण हे का करतोय.

- Advertisement -

दुसऱ्यांबरोबर तुलना-दुसऱ्याबरोबर तुलना करणं हा मानवी स्वभाव आहे. पण यामुळे लाभ तर नक्कीच होत नाही उलट पदरात अपयशच येतं. यामुळे तुलनेपासून दूर राहावे. त्याने केलं मग मी का नाही किंवा त्याला जमलं ते मला का नाही असा विचार करत प्रेरणा घेण्यास हरकत नाही. पण त्याला बिझनेसमध्ये १०० टक्के य़श मिळाले मग मला पम मिळणार हे आधी डोक्यातून काढा. कारण समोरच्या व्यक्तीने त्यासाठी काय कष्ट केलं असतील ते आपल्याला ठाऊक नसते. यामुळे आधी ती पार्श्वभूमी तपासा.

 

 

 

 

 

 

- Advertisment -

Manini