Thursday, February 22, 2024
घरमानिनीBeautyमुरुमाच्या त्रासाने त्रस्त आहात? 'हे' उपाय येतील कामी

मुरुमाच्या त्रासाने त्रस्त आहात? ‘हे’ उपाय येतील कामी

Subscribe

हल्ली मुरूमांची समस्या तरुणांमध्ये अधिक आढळून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयीमुळे चेहर्‍यावर मुरुम येतात. यासाठी बाजारात अनेक केमिकल उत्पादने असतात. मात्र, त्यांचा परिणाम हा कायमस्वरुपी नसतो. मुरुमे घालवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.

Skincare tips for busy women: 7 easy tips | HealthShots

- Advertisement -

 

  • बर्फ थेरपी

चेहर्‍यावर मुरुमे आल्यास त्यावर बर्फ लावणे उत्तम मानले जाते. यामुळे मुरुमांचा लालसरपणा कमी होतो. तसेच सूजही कमी होते. बर्फ लावल्याने मुरुमे कमी होण्यास मदत होते. कपड्यामध्ये बर्फ घेऊन तो मुरुमांच्या जागी काही वेळ ठेवा. ही प्रक्रिया दिवसभरात 2-3 वेळा करा.

- Advertisement -
  • स्टीम

चेहर्‍यावर चमक हवी असल्यास स्टीम घेणं गरजेचं आहे. यामुळे केवळ चेहर्‍यावरील घाण दूर होत नाही तर त्वचा मुलायम होण्यास मदत होते. स्टीममुळे रोमछिद्रे खुली होतात. यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते.

  • लसूण

लसणामध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल तसेच अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म असल्याने मुरुमांवर लसूण गुणकारी ठरते. यातील सल्फर त्वचेसाठी लाभदायक असतात. लसूण सोलून त्याची पेस्ट करुन मुरुमांवर लावा. पाच ते सात मिनिटे लावून चेहरा कोमट पाण्याने धुवा.

5 ways to improve skin health

  • टोमॅटो

टोमॅटो तेलकट त्वचेसाठी उपयुक्त असतात. टोमॅटोमुळे ब्लॅकहेड्स तसेच चेहर्‍यावरील काळेपणा दूर करण्यास उपयोग होतो. ताज्या टोमॅटोचा रस काढून चेहर्‍यावर लावा. त्यानंतर एका तासाने चेहरा धुवा.

  • केळ्याची साल

केळी खाणं शरीरासाठी जितकं फायदेशीर आहे तितकीच केळ्याची साल देखील उपयोगी असते. मुरुम झाल्यास केळ्याच्या सालीच्या आतील भाग चेहर्‍यावरुन फिरवा. 5 मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका.


हेही वाचा :

तजेलदार चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन ‘ए’ फायदेशीर

- Advertisment -

Manini