Friday, February 23, 2024
घरमानिनीBeautyटाचांना भेगा पडल्याने त्रस्त आहात, मग करा 'हे' घरगुती उपाय

टाचांना भेगा पडल्याने त्रस्त आहात, मग करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

हिवाळा ऋतू अनेकांचा आवडता असला तरी या ऋतूमध्ये अनेक त्वचा विकार उद्भवतात. ज्यामध्ये त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, पायाच्या टाचांना भेगा पडणे यांसारख्या समस्या आहेत. टाचांना भेगा पडल्यामुळे टाचेचे सौंदर्य हरवून जाते. यासाठी आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत.
ज्यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

उपाय

  • 50 ग्रॅम आमसुलाचे तेल
  • 20 ग्रॅम मेण
  • 10 ग्रॅम स्वर्णक्षीरी किंवा कटुपर्णीच्या बियाणांची भुकटी
  • 25 ग्रॅम साजूक तूप

असे करा तयार

  • वरील सर्व साहित्य मिसळून एकजीव करून बाटलीत भरून ठेवा. झोपताना पायाला स्वच्छ धुऊन पुसून हे औषध भेगांमध्ये भरा आणि मोजे घालून झोपा. काहीच दिवसात भेगा नाहीशा होतील. तळपाय स्वच्छ, नरम होतील.
  • त्रिफळा चूर्ण घेऊन त्याला खाद्यतेलात भाजून घ्यावे आणि ते मिश्रण झोपताना भेगांमध्ये लावले याउपायाने देखील काही दिवसातच भेगा नाहीशा होतात.

फाटलेल्या टाचांसाठी इतर उपाय

Foot Fissures – Symptoms, Causes, Treatment, Prevention & Remedies

- Advertisement -
  • टाचा फाटल्यास त्यात घाण जमा होणार नाही याकडे लक्ष द्या. घाण जमा झाल्यास ती वेळेवर साफ करणे महत्त्वाचे आहे.
  • पायांना दररोज मॉइस्चरायझर किंवा तेल लावावे. त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.
  • पाय 20 मिनिटे कोमट पाण्यात ठेवा,त्यानंतर स्वच्छ करा यानेही तुम्हाला आराम मिळेल.
  • व्हिटामिन्सची कमतरता दूर करण्यासाठी योग्य संतुलित आहार घ्या.

 


हेही वाचा :

थंडीत सतत पेट्रोलियम जेलीचा वापर करताय? व्हा सावध…

- Advertisment -

Manini