Suicide Prevention Day : तुमच्या मनात आत्महत्येचा विचार येतो का, मग हे वाचा!

suicide
आत्महत्या

लॉकडाऊनच्या काळात नैराश्यातून आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या. त्यात अगदी सामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटीं असणाऱ्यांचाही समावेश होता. बॉलिवूड, टॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आत्महत्येचे प्रमाण या काळात वाढले. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आत्महत्येच्या कितीतरी घटना कानावर पडल्या. पण जेव्हा एखादी व्यक्ती लगेचच इतकं टोकाचं पाऊल उचलते असं नाही, तर त्या आधी व्यक्तीमध्ये अनेक लक्षणं दिसतात.

suicide
आत्महत्या

दरवर्षी १०  सप्टेंबर हा दिवस आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटनेतर्फे हा दिवस आयोजित करण्यात आला आहे. जगभर जागृती करण्याची ही एक संधी आहे की आत्महत्या रोखता येऊ शकतात. सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगाचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. घरी राहणे, कमी शारिरीक व्यायाम, मी समाजकारण आणि प्रत्येक गोष्टीच्या कार्यप्रणालीत अनपेक्षित बदलामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखणे महत्वाचे झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. दरवर्षी जवळपास ८ लाख लोकं आत्महत्या करतात. साधारण एका आत्महत्येमागे २० पेक्षा अधिक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो.

तेव्हाच एवढे टोकाचे पाऊल उचलले जाते

एखाद्या व्यक्तीच्या भावना खूप दुखावल्या असतील, जवळच्या व्यक्तीमुळे त्रास झाला असेल किंवा नातेसंबंध बिघडले असतील आणि सगळ्यात महत्त्वाच आयुष्याला कंटाळलेली असेलतर ती व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते. डिप्रेशन, मद्यपान, ड्रग्ज,  गंभीर किंवा दीर्घकाळ आजारपण देखील आत्महत्येसाठी कारण ठरू शकतं.

ही आहेत लक्षणं

आत्महत्येचा विचार मनात आलेली व्यक्ती सतत नकारात्मक विचार करते. त्यांना त्यांच्या आयुष्यात काही चांगलं नाही, आपलं कुणीच नाही असं वाटायला लागतं. अशा व्यक्ती नेहमी आत्महत्येबाबत बोलत असतात. इंटरनेटवर किंवा इतर ठिकाणी आत्महत्येचा मार्ग शोधतात. जवळच्या व्यक्तीपासून दूर राहतात. आपली इच्छा लिहून ठेवतात.


हे ही वाचा – तुम्हालाही रात्री झोप येत नाही? मग ‘हे’ करा