उन्हाळ्यात मुलांना हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही मुलांना हायड्रेटेड ठेवले नाही तर उन्हाळ्यात त्यांचे आरोग्य बिघडू शकते. अनेकदा मुलं पुरेसं पाणी पित नाहीत म्हणून पालक त्यांना कोल्ड्रिंक प्यायला देतात. मात्र याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मुलांसाठी ज्यूस हा एक चांगला पर्याय आहे. पौष्टिक फळांचा रस या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या पोटात गेल्यास त्यांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच, जर तुम्हाला मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर उन्हाळ्यात थंड पेयांऐवजी त्यांना हे घरगुती रस द्या. यामुळे मुलांचे आरोग्य तर सुधारेलच पण त्यांना दिवसभर ताजेतवाने देखील वाटेल. कोल्ड्रिंक्सपेक्षा ज्यूस हा एक चांगला पर्याय असू शकतो. उन्हाळ्यात मुलांना देण्यासाठी योग्य असलेले 4 खास प्रकारचे ज्यूस येथे आहेत.
1.संत्र्याचा रस
संत्र्याच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय, संत्र्याचा रस तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करतो. या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या मुलांना संत्र्याचा रस देऊ शकता. आंबटगोड संत्र्याचा रस मुलांना चवीलाही फार आवडतो.
2. कलिंगडाचा रस
उन्हाळ्यात मुलांसाठी कलिंगडाचा रस हा एक चांगला पर्याय आहे. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे मुलांना हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. याशिवाय, कलिंगडाच्या रसात व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन भरपूर प्रमाणात असते, जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कलिंगडाचा रस मुलांचे पोट थंड ठेवतो. यामुळे मुलांना थंडगार आणि फ्रेश वाटते.
3.पपईचा रस
उन्हाळ्यात पपईचा रस हा एक उत्तम उपाय आहे. पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे पचनक्रियेला मदत करते. याशिवाय पपईच्या रसात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही पपईचा रस बनवून सकाळी आणि संध्याकाळी मुलांना देऊ शकता.
4.द्राक्षांचा रस
मुलांना द्राक्षाचा रस खूप आवडतो. कोल्ड्रिंकऐवजी तुम्ही मुलांना द्राक्षाचा रस देऊ शकता. द्राक्षांमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते, जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. याशिवाय, द्राक्षाचा रस तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करतो. मुलांना रस देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्लाही अवश्य घ्यायला हवा. याशिवाय, रस नेहमी ताजा असावा आणि स्वच्छ पद्धतीने तयार केलेला असावा.
हेही वाचा : Parenting Tips : मुलं न जेवण्यामागे असू शकतात ही कारणे
Edited By – Tanvi Gundaye