उन्हाळ्यात डिहाड्रेशनचा त्रास वारंवार जाणवतो. यासाठी भरपूर पाणी किंवा द्रव पदार्थ पिण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचाही निरोगी राहते. हल्ली उन्हाळ्यात थंडाई खूप जास्त प्रमाणात प्यायली जाते. थंडाई प्यायल्याने शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा मिळतो, ज्यामुळे उष्णता आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या निर्माण होत नाही. याशिवाय थंडाई स्वादिष्ट असल्याने चवीलाही उत्तम लागते. जर तुम्ही उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करणारे हेल्दी पेय शोधत असाल तर थंडाई बेस्ट असेल. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात, उन्हाळ्यात होममेड थंडाई पिण्याचे फायदे
होममेड थंडाई पिण्याचे फायदे
- थंडाई बनवताना त्यात बडीशेप वापरली जाते. बडीशेपमधील ऍटी-इन्फ्लेमेंटरी गुणधर्म शरीरात थंडावा निर्माण करतात आणि पोटाचे आरोग्यही स्वस्थ ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्यात पोट निरोगी ठेवण्यासाठी थंडाई प्यायला सांगितली जाते.
- थंडाई बनवताना त्यात काजू-बदाम वापरले जातात. हे ड्रायफ्रुट्स अनेक पोषकतत्वांनी परिपूर्ण आहेत. या पोषकतत्वांमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते. त्यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या चिडचिडीपासून आराम मिळण्यासाठी थंडाई अवश्य प्यावी.
- थंडाईमध्ये कोणत्याही प्रकारचे शरीराला घातक असे पदार्थ वापरले जात नाही. त्यामुळे शरीरासाठी उन्हाळ्यात थंडाई पिणे फायद्याचेच ठरते.
- शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी थंडाई पिणे फायद्याचे ठरते. सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या विषाणूजन्य संसर्गाचा धोका कमी होतो.
थंडाई घरी कशी बनवाल –
साहित्य –
- दूध – 3 ते 4 कप
- बदाम-काजू
- बडीशेप, खसखस – २ चमचे
- काळी मिरी – 3 ते 4
- वेलची पावडर – 1 चमचा
- केशर – चिमुटभर
- गुलाबाच्या पाकळ्या
- साखर
कृती –
- थंडाई बनवण्यासाठी एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात केशरच्या काड्या घाल्याव्यात.
- यानंतर दुसऱ्या भांड्यात बदाम, काजू, बडीशेप, खसखस, वेलची पावडर आणि गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात मिक्स कराव्यात आणि एक तास पाणी तसेच ठेवावे.
- एका तासानंतर पाणी गाळून बाजूला घ्या.
- त्यातील बियांचे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे आणि त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा.
- या मिश्रणात केशराचे दूध घाला आणि फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेवा.
अ - शा पद्धतीने तुमची समर स्पेशल होममेड थंडाई तयार झाली आहे.
हेही पाहा –