उन्हाळ्यात फॅशन करताना आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, त्यामुळे जास्त बॉडी फिटिंग कपडे घालू नये या कपड्यांमुळे तुम्हाला अजून घाम येऊ शकतो. या ऋतूत आरामदायी कपडे परिधान केल्याने थंड वाटेल आणि तुम्ही स्टायलिशही दिसाल. उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसण्यासाठी कोणते कपडे परिधान करावे असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. आज आपण जाणून घेऊयात उन्हाळ्यात स्टायलिश लूक कसा करायचा.
सफेद रंग
उन्हाळ्यात आपल्या वॉर्डरोबमध्ये सफेद रंगाचे आऊटफिट असले पाहिजे. उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, लखनवी सूट, अनारकली, साडी, शर्ट, पेन्सिल स्कर्ट, ट्राउझर्स इत्यादी तुम्ही निश्चितपणे ट्राय करू शकता. तसेच काळा किंवा पांढरा रंग देखील वापरू शकता.
पेस्टल कलर
तुम्ही उन्हाळ्यात सफेद रंगासह पेस्टल रंगाचे कपडे देखील घालू शकता. पिंक, यलो, ऑरेंज, लैवेंडर, ऑलिव ग्रीन असे पेस्टल कलर खूप सुंदर दिसतील.
प्रिंट्स
उन्हाळ्यात प्रिंट्स निवडताना, फ्लोरल प्रिंट्सना प्राधान्य द्या. उन्हाळ्यात हे प्रिंट्स खूप सुंदर दिसतात. याशिवाय चेक्स, स्ट्राइप्स, प्रिंट्स देखील ट्राय करू शकता. फिटिंगसाठी देखील उत्तम आहे.
आरामदायी फिटिंग
उन्हाळ्यात आरामदायी कपडे खूप चांगले दिसतात. जास्त फिट कपडे घातल्याने तुम्हाला खूप घाम येऊ शकतो त्यामुळे सैल कपड्यांची निवड करा. शॉर्ट ड्रेस, मैक्सी ड्रेस, कॉटन टी-शर्ट, प्लाजो, लॉन्ग कुर्ती, प्लीटेड स्कर्ट, व्हाइट शर्ट या लिनेन जैकेट, एसिमिट्रिकल टॉप, कॉटन साड़ी इत्यादी उत्तम पर्याय आहे.
पार्टीसाठी
जर तुम्हाला पार्टीसाठी जायचं असेल तर चांदीचा रंगही खूप पसंत केले जाते. उन्हाळ्यात तुम्ही चांदीच्या रंगाचा पार्टी वेअर ड्रेस देखील घालू शकता. याशिवाय, तुम्ही अनारकली, लेहेंगा-चोली, पारंपारिक गाऊन किंवा ऑलिव्ह ग्रीन, गुलाबी, पीच अशा पेस्टल रंगांमध्ये साडी देखील घालू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : या ड्रेसवर स्टोन नेकलेस करा ट्राय
Edited By : Prachi Manjrekar