उन्हाळ्याच्या दिवसात, उष्णतेच्या लाटेपासून आणि तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी नेहमी डोके आणि चेहरा झाकून ठेवायला हवा. जर अशा हवामानात कुठेतरी बाहेर जायचे झाले तर अशा वेळी तुम्ही शरीराचे तापमान थंड ठेवायला हवे. म्हणूनच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी बाजारात सध्या अनेक कॅप्स व हॅट्स मिळू लागल्या आहेत. ज्या परिधान करून उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करता येऊ शकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या स्टाईल करू शकता.आजच्या लेखात जाणून घेऊयात उन्हाळ्यात वापरता येऊ शकणाऱ्या समर कॅप्स आणि हॅट्सविषयी. ज्यांना तुम्ही या हंगामात तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवू शकता.
क्लासिक बेसबॉल कॅप्स-
तुम्ही कॅज्युअल आउटफिट्ससोबत या प्रकारच्या कॅप्स कॅरी करू शकता. ही टोपी पुरुष आणि महिला दोघेही स्टाईल करू शकतात आणि ती तुम्हाला एक फंकी आणि टॉम्बॉयिश लूक देखील देते. तुम्ही या प्रकारच्या कॅप्स मोठ्या आकाराच्या शर्ट किंवा क्रॉप टी-शर्टसह घालू शकता. या टोप्या विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग निवडू शकता.
बोटर हॅट-
बोटर हॅट्स वर्षानुवर्षे आपल्या फॅशनचा एक भाग आहेत. सुरुवातीला या हॅट्स फ्रान्समधील पुरुष परिधान करत होते, परंतु आता काळानुसार महिलाही ते स्टाईल करू लागल्या आहेत. तुम्ही या प्रकारच्या टोप्या गाऊन आणि शॉर्ट फ्लोरल आउटफिट्ससह स्टाईल करू शकता. बाहेर जाताना या प्रकारच्या टोप्या तुमचा लूक आणखी स्टायलिश बनवतील.
सन हॅट्स-
सन हॅट्सचा आकारही काहीसा बोटर हॅट्ससारखाच असतो. या प्रकारच्या टोप्या उन्हापासून तुमचे संरक्षण करतात. तुम्हाला या टोप्या अनेक प्रकारच्या तंतूंमध्ये मिळू शकतात, म्हणून तुम्ही स्वतःसाठी आरामदायी तंतूपासून बनवलेली टोपी निवडू शकता. तुम्ही त्यांना शर्ट, टी-शर्ट, मिडी ड्रेसेससह स्टाईल करू शकता.
बकेट हॅट्स-
बकेट हॅट्स गेल्या काही काळापासून ट्रेंडमध्ये आहेत. बॉलीवूडच्या मोठ्या सेलिब्रिटींनीही बकेट हॅट्सना त्यांच्या फॅशन अॅक्सेसरीजचा एक भाग बनवले आहे . अशा परिस्थितीत, जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या लूकमध्ये काहीतरी नवीन ट्राय करायचे असेल, तर तुम्ही या स्टायलिश बकेट हॅट्स तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवू शकता. हे तुमच्या कॅज्युअल आउटफिटसोबत छान दिसतील, जे तुम्ही जीन्स, टी-शर्ट, टॉप आणि शॉर्ट्स सारख्या ड्रेसेससोबत स्टाईल करू शकता.
व्हिझर हॅट-
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विशेषतः व्हिझर हॅट्स वापरल्या जातात. या टोपीचे वैशिष्ट्य म्हणजे ती घालताना किंवा काढताना तुमचे केस इतर टोप्यांसारखे खराब होत नाहीत. त्यामुळे, अशी टोपी महिलांसाठी खूप उपयुक्त ठरेल जेणेकरून त्यांचे केस तसेच राहतील. खेळ खेळणाऱ्या महिलांसाठी व्हिझर हॅट्स सर्वोत्तम आहेत आणि धावतानाही त्या सहजपणे त्या स्टाईल करता येऊ शकतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या टोप्या उपलब्ध आहेत, ज्या तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार निवडू शकता.
हेही वाचा : Amla Benefits: रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुणकारी आहे आवळा
Edited By – Tanvi Gundaye