Wednesday, April 17, 2024
घरमानिनीSummer Food : घरच्या घरी बनवा गाजराचं लोणचं

Summer Food : घरच्या घरी बनवा गाजराचं लोणचं

Subscribe

गाजराचे लोणचे रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसात अनेक गृहिणी घरच्या घरी लोणचे करतात. मात्र, बऱ्याचदा आंब्याचे, मिरचीचे लोणचे केले जाते. आज आम्ही तुम्हाला झटपट असे चटपटीत गाजराचे लोणचे कसे करायचे ते दाखवणार आहोत.

साहित्य : 

  • 1/2 किलो गाजरं
  • 50 ग्रॅम कुठलाही तयार लोणचे मसाला
  • काश्मिरी लाल तिखट मसाला
  • 2 मोठ्या लिंबांचा रस
  • 2 चमचे मीठ
  • 1/2 चमचा हळद
  • 100 ग्रॅम तेल
  • 50 ग्रॅम राई
  • 1/4 चमचा हिंग

कृती : 

Gajar Ka Achar | Carrot Pickle Recipe | Tasty And Quick Pickle Recipe : r/VeganFoodPorn

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम एका कढईत तेल घ्यावे.
  • त्यानंतर तेल कडकडीत तापल्यावर त्यात राई आणि हिंग टाकून त्याची खमंग फोडणी तयार करा. नंतर ती थंड करायला ठेवा.
  • दरम्यान गाजराचे चांगले बारीक तुकडे करून घ्या.
  • त्यात लिंबाचा रस, मीठ, मसाला, हळद टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा.
  • मग त्यात थंड झालेली फोडणी टाकावी आणि परत एकदा मिश्रण चांगले एकजीव करून एका बरणीत भरून ठेवा.
  • अशाप्रकारे झटपट घरच्या घरी गाजराचे लोणचे तयार.

हेही वाचा :

Summer Food : अशा प्रकारे तयार करा मिरचीचे लोणचे

- Advertisment -

Manini