जेवणात लोणचं असल्यास जेवणाची चव अधिक चविष्ट होते. त्यात जर आंबट-तिखट लोणचे असेल तर अधिक उत्तम. मात्र, काहींना बाजारातील लोणच खाण्यास आवडत नाही. अशा वेळी घरच्या घरी चविष्ट आणि तिखट लोणचे एकदा तरी अवश्य करुन पाहा.
साहित्य :
- 1/2 किलो हिरवी मिरची
- 1 वाटी मोहरीची डाळ
- 1/4 चमचा मेथीची (कच्ची) पूड
- 3/4 चमचा हळद
- 1 चमचा हिंग
- 2 वाट्या मीठ
- 6 लिंबाचा (रस)
- 1/2 वाटी तेल
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम एका ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद आणि हिंग घालावे आणि कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते ताटलीच्या पदार्थांवर ओतावे आणि झार्याने ढवळावे.
- मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावे. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे.
- त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा आणि बरणीत 2 चमचे मीठ घालावे.
- त्यात मिरच्या आणि मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसर्या किंवा तिसर्या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा. अशाप्रकारे तुमचे मिरचीचे लोणचे तयार.
हेही वाचा :