घरलाईफस्टाईलउन्हाळ्यातही फ्लोरिंग राहील कूल कूल

उन्हाळ्यातही फ्लोरिंग राहील कूल कूल

Subscribe

सध्या उन्हाळा सुरु झाल्याने बाहेरच्या तापमानामुळे घरात गरम होत राहते. काहीवेळेस आपले फ्लोरिंग ही गरम होते. तर अशावेळी काय करावे हे कळत नाही. त्यामुळे आपली चिडचिड होऊ लागते. जर तुमच्या सोबत सुद्धा असेच होत असेल तर पुढील काही टीप्स तुम्ही जरुर फॉलो करा.

-विंडो ब्लाइंड्स (Window blinds) बंद ठेवा

- Advertisement -


घरात सुर्याची किरणे येणे फार उत्तम मानले जाते. पण उन्हाळ्यात अधिक उन घरात आल्याने गरम होऊ लागते. खरंतर दुपारी घरात येणाऱ्या उन्हामुळे जमीन गरम होते. अशातच तुमचे फ्लोरिंग थंड राहण्यासाठी तुम्ही विंडो ब्लाइंड्स बंद करुन ठेवा.

-सकाळच्या वेळी किचनची कामे थोडी कमी करा

- Advertisement -


उन्हाळ्यादरम्यान तुम्हाला हवेशीर आणि थंड वाटावे म्हणून खासकरुन किचनची कामे थोडी कमीच करा. गॅसवर वारंवार जेवण करु नका. पदार्थ वारंवार शिजवताना किचनमध्ये वाफ निर्माण होऊन गरम होऊ लागते. यामुळेच दुपार होण्याआधी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमचे जेवण बनवून ठेवू शकता.

-कार्पेट्सचा वापर करा


उन्हाळ्यात तुमचे फ्लोरिंग गरम होत असेल तर तुम्ही कार्पेट्सचा वापर करु शकता. अथवा रग्स ही वापरु शकता. यामुळे तुमच्या घराचा हॉल ही सुंदर दिसेल. कार्पेट्सचा आणखी एक उत्तम वापर असा की, जर तुम्हाला जमीनीवर बसायचे असेल तर आरामात बसू शकता.

-रात्रीच्या वेळे खिडक्या उघडा


खोलीतील जमीन थंड रहावी म्हणून रात्रीच्या वेळेस घराच्या खिडक्या उघड्या करुन ठेवा. जेणेकरुन घरात हवा खेळती राहिल आणि गरम ही होणार नाही.


हेही वाचा- Health Tips : मातीची भांडी वापरल्यास हृदय राहील healthy

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -