भारतात अशी अनेक हिल स्टेशन्स आणि थंड हवेची ठिकाणे आहेत जी उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आदर्श अशी पर्यटन स्थळे आहेत. येथील शांत दऱ्या, हिरवीगार जंगले आणि तलाव उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देतात. अशा सुंदर ठिकाणी तुम्ही तुमची सुट्टी आनंदाने घालवू शकता.जर तुम्हीही या उन्हाळ्यात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आज आपण जाणून घेऊयात अशा काही ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सट्ट्या संस्मरणीय बनवू शकता.ही ठिकाणे तुमच्या प्रवास यादीत नक्कीच असायला हवीत.
1. शिमला, हिमाचल प्रदेश
शिमला हे भारतातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक आहे, जे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हिरवेगार पर्वत, थंड हवामान आणि सुंदर दृश्ये या ठिकाणाला खास बनवतात. मॉल रोड, जाखू मंदिर, कुफरी आणि रिज ही शिमलाची मुख्य आकर्षणे आहेत, जिथे पर्यटक त्यांचा वेळ आनंदाने घालवू शकतात.
2. मनाली, हिमाचल प्रदेश
जर तुम्हाला उन्हाळ्यात साहस आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर मनाली हा सर्वोत्तम पर्याय आहे. सोलांग व्हॅली, रोहतांग पास आणि हिडिंबा मंदिर यासारखी ठिकाणे येथे भेट देण्यासारखी आहेत. हे ठिकाण ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंग सारख्या साहसी ऍक्टिव्हिटीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
3. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
दार्जिलिंग हे त्याच्या हिरव्यागार टेकड्या, चहाचे मळे आणि टॉय ट्रेनसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात येथील हवामान खूप आल्हाददायक असते. टायगर हिल, बटासिया लूप आणि जपानी पॅगोडा येथून दिसणारे अद्भुत सूर्योदय दृश्य ही येथील मुख्य आकर्षणे आहेत. नैसर्गिक सौंदर्यासोबतच शांतता शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक आदर्श पर्यटन स्थळ आहे.
4. उटी , तामिळनाडू
दक्षिण भारतात असलेले उटी हे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. याला “टेकड्यांची राणी” असेही म्हणतात. येथील चहाचे मळे, उटी तलाव, दोड्डाबेट्टा पीक आणि बोटॅनिकल गार्डन पर्यटकांना खूप आकर्षित करतात. थंड वारा आणि हिरवीगार दृश्ये उटीला खास बनवतात.
5. लडाख, जम्मू आणि काश्मीर
जर तुम्हाला साहस आणि नैसर्गिक सौंदर्याचा मिलाफ अनुभवायचा असेल तर लडाखपेक्षा चांगले ठिकाण नाही. येथील उंच टेकड्या, शांत तलाव आणि मनमोहक निसर्ग प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतात. पँगाँग लेक, नुब्रा व्हॅली, मॅग्नेटिक हिल आणि लेह पॅलेस ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. हे ठिकाण बाईक रायडर्स आणि साहस प्रेमींसाठी अगदी स्वर्गासारखे आहे.
हेही वाचा : Summer Diet : उन्हाळ्यात अवश्य खाव्यात या भाज्या, राहाल फिट आणि फाईन
Edited By – Tanvi Gundaye