Thursday, June 1, 2023
घर मानिनी Relationship Summer Vacation... उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना शिकवा 'या' गोष्टी

Summer Vacation… उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना शिकवा ‘या’ गोष्टी

Subscribe

उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की मुलं खुप आनंदित होतात. परंतु याच दरम्यान त्यांना काही नव्या गोष्टी शिकवण्याची योग्य वेळ असते. पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत वेळ घालवलाच पाहिजे. परंतु त्यांना अशा काही गोष्टी शिकवाव्यात ज्या त्यांना नेहमीच कामी येतील.

-मुलांच्या आवडीच्या अॅक्टिव्हिटी

- Advertisement -


उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेता घेता मुलांना त्यांच्या आवडीच्या अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतवा. जसे की, पेटिंग, डान्सिंग , सिगिंग. यामुळे सुट्टीत झोपणे, खेळण्याशिवाय या सुद्धा अशा काही एक्स्ट्रा अॅक्टिव्हिटी ते करु शकतील.

-समर कॅम्पसाठी पाठवा

- Advertisement -


जर तुमच्या मुलांना फिरण्याची आवड असेल तर त्यांना समर कॅम्पला जरुर पाठवा. यावेळी त्यांना काही नव्या गोष्टी शिकायला मिळतीलच. पण त्याचसोबत त्यांचा आत्मविश्वास ही वाढेल. दुसऱ्या इतर मुलांसोबत ते मिळून मिसळून राहतील. सर्वात महत्वाचे म्हणजे ते पालकांशिवाय कसे रहायचे हे सुद्धा शिकतील.

-घरातील कामे शिकवा


मुलांना तुम्ही घरातील काही सोप्पी कामे शिकवू शकका. जसे की, किचन मध्ये वस्तू व्यवस्थित कशा ठेवायच्या, फळ-भाज्या कापणे, स्वच्छता कशी करावी असे काही. या व्यतिरिक्त काही सोप्प्या रेसिपीज सुद्धा तुम्ही मुलांना शिकवा.

-ऑनलाईन कोर्स लावा


समर वेकेशनसाठी खास कोर्स तयार केले जातात. अशातच तुम्ही मुलांना एखादा त्यांच्या आवडीच्या ऑनलाईन कोर्स लावा. ते तेथून काहीतरी शिकतील. या व्यतिरिक्त तुम्ही मुलांना योगा किंवा व्यायामचे कोर्स ही लावू शकता.


हेही वाचा- नोकरी करणाऱ्या couples साठी ‘या’ आहेत Parenting Tips

- Advertisment -

Manini