Monday, December 4, 2023
घरमानिनीKitchenOmelette Curry : सन-डे स्पेशल ऑम्लेट करी

Omelette Curry : सन-डे स्पेशल ऑम्लेट करी

Subscribe

रविवारी अनेकांच्या घरी नॉन व्हेज बनवले जाते. आज आम्ही तुम्हाला झणझणीत ऑम्लेट करीची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

 • 4 अंडी
 • खोवलेला ओला नारळ अर्धी वाटी
 • 1 चमचा धने
 • 1/2 चमचा जिरे
 • 1/4 चमचा काळी मिरी
 • 1/4 चमचा बडीशेप
 • 2 कांदे
 • 1 टोमॅटो
 • 1 चमचा आले-लसूण वाटून
 • 1 चमचा हळद
 • 1 चमचा लाल तिखट
 • 1/2 चमचा गरम मसाला
 • 1/2 चमचा कसुरी मेथी
 • मीठ

कृती : 

Egg Omelette Curry | Buy Latasha's Kitchen Products Now

- Advertisement -
 • नारळ, धने, जिरे, काळी मिरी, बडीशेप हे एकत्र गुळगुळीत वाटून घ्यावे.
 • एका भांड्यात अंडी फेटून घ्यावी. त्यात थोडा चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, मीठ घालून त्याचे ऑम्लेट बनवावे.ऑम्लेटचे चौकोनी तुकडे करावेत.
 • एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात वाटलेले आले-लसूण, कांदा हे लालसर परतावे. मग त्यात किसलेला टोमॅटो घालावा.
 • सर्व मसाले घालून थोडे पाणी घालावे आणि उकळायला ठेवावे.
 • चांगले उकळल्यावर त्यात ऑम्लेटचे चौकोनी काप टाकून त्याला वाफ आणावी.
 • गरमागरम ऑम्लेट करी भाकरीसोबत सर्व्ह करावी.

हेही वाचा :

Photo : मुलांसाठी बनवा ‘बनाना मफिन’

- Advertisment -

Manini