Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीSunidhi Chauhan: सुनिधी चौहानने 10 दिवसात 5 किलो वजन केलं कमी, पण...

Sunidhi Chauhan: सुनिधी चौहानने 10 दिवसात 5 किलो वजन केलं कमी, पण कसं?

Subscribe

सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने तिच्या नवीन ‘डान्स नंबर’ गाण्यासाठी अवघ्या 10 दिवसात ५ किलो वजन कमी केले आहे. सध्या सुनिधी चौहानच्या वेटलॉस ट्रान्शफॉर्मेशनची चर्चा सुरू आहे. वयाची चाळीशी ओलांडली असली तरी सुनिधीने केवळ 10 दिवसात जवळपास 5 किलो वजन कमी केलं आहे. त्यामुळे सर्वाना सुनिधीचा वेटलॉस फंडा जाणून घेण्याबाबत उत्सुकता आहे. नुकतंच सुनिधीने तिच्या फिटनेस आणि डाएटशी संबधित काही गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत.

वेटलॉस फंडा –

सुनिधी चौहानने वेटलॉस फंडाबाबत एका मुलाखतीत सांगितले आहे की, वेटलॉससाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे तुम्ही काय खाता. योग्य आहार करणे आवश्यक असते, असे ती म्हणाली. सुनिधी कॅलरी कंट्रोल डाएट प्लॅन फॉलो करते. या डाएटमध्ये ती रोज 1200 पेक्षा जास्त कॅलरी इन्टेक करते. यासह ती दररोज 16 तास फास्टिंग करते आणि 8 तासांच्या कालावधीमध्ये अन्न खाते. या डाएट प्लॅनमुळे सुनिधीचे वजन कमी झाले आहे, असे सुनिधीने या मुलाखतीत म्हटले आहे.

वेटलॉससाठी कोणते पदार्थ खाल्ले?

सुनिधी दिवसाची सुरूवात अंड खाऊन करते. याशिवाय कधी ती सकाळी आंबट सॉरडो ब्रेडही खाते. याशिवाय या मुलाखतीत डाएट फॉलो करणाऱ्या तिने मोलाचा संदेश दिला आहे. Intermittent Fasting करताना दिवसाची सुरूवात प्रोटिन्स आणि फॅट्सने करायला हवी. शरीरात सकाळी कार्बोहायड्रेट्स करण्याऐवजी प्रोटिन्स आणि फॅट्सने करणे आवश्यक आहे असं ती म्हणाली आहे. सुनिधी पुढे सांगते की, मला भूक लागते तेव्हा मी जेवते. मला मध्ये भूक लागल्यास मी नट्स खाते, जे खाऊन माझे पोट दिर्घकाळ राहते. वेटलिफ्टिंग मी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करते. वेट लिफ्टिंग करताना मी प्रोटीन शेक पिते. याशिवाय दिवसाचे मील अर्थात रात्रीचे जेवण 7:30च्या सुमारास करते, त्यानंतर मी पुन्हा  काहीही खात नाही, असा वेटलॉस फंडा सुनिधीने मुलाखतीत शेअर केला आहे.

डाएटमधील महत्वाचे मुद्दे – 

  • योग्य आहार
  • कॅलरी कंट्रोल डाएट प्लॅन
  • 16 तास फास्टिंग
  • दिवसाची सुरूवात अंड किंवा आंबट सॉरडो ब्रेडने
  • भूक लागल्यावर नट्स खाणे
  • वेट लिफ्टिंग करताना प्रोटीन शेक पिणे
  • रात्रीचे जेवण 7:30च्या सुमारास करणे

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini