घरनवरात्रौत्सव 2022यंदा नवरात्रोत्सवात 'या' टॅटूची अफलातून चलती

यंदा नवरात्रोत्सवात ‘या’ टॅटूची अफलातून चलती

Subscribe

यंदाच्या नवरात्रोत्सवात असे अफलातून टॅटू गोंदवून आजची तरूणाई व्यक्त होताना दिसत आहे.

देशभरात नुकतीच नवरात्रोत्सला जोरदार सुरूवात झाली आहे. यंदाच्या या नवरात्रोत्सवाला दरवर्षीप्रमाणे तरूणांचा जल्लोष तेवढाच पाहायला मिळत आहे. या नवरात्रोत्सवाच्या गरब्याकरिता कपड्यांच्या तयारीसह टॅटू गोंदवून घेण्याची देखील लगबग पाहायला मिळत आहे. मात्र या वर्षीची टॅटूची थीम काही वेगळीच आहे. चांद्रयान-२ आणि नव्या वाहतूकीच्या नियमांवर तरूणाई टॅटू गोंदवून घेत आहेत. अशाप्रकारचे अफलातून टॅटू गोंदवून आजची तरूणाई व्यक्त होताना दिसत आहे.

- Advertisement -

यासोबत कलम ३७०, चांद्रयान-२ च्या टॅटूची मोठी चलती असून अशा नाविन्यपुर्ण टॅटू तरूणासाठी स्टाइल सिम्बॉल झाला आहे. गुजरातमध्ये ही फॅशन विशेषतः सूरतमध्ये चांगलीच दिसत असून सरकारच्या निर्णयाचे आणि कामगिरीविषयीचे टॅटू काढण्याची क्रेझ तरूणींमध्ये आहे.

- Advertisement -

मोदी-ट्रम्प यांचे मैत्रीपुर्ण संबंध, चांद्रयान- २, प्लास्टिक बॅन, काश्मिरमधील कलम या संकल्पनेवर आधारित तरूण महिला वर्ग टॅटू बनवून घेत आहेत. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात हे टॅटू चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. हे टॅटू हातावर काढण्यापेक्षा पाठीवर काढणे तरूणी जास्त पसंत करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -