Tuesday, January 7, 2025
HomeमानिनीSweater Hacks : जुन्या स्वेटरपासून बनवा मोजे ते बॉटल कव्हर

Sweater Hacks : जुन्या स्वेटरपासून बनवा मोजे ते बॉटल कव्हर

Subscribe

अनेक वेळा आपण रोजच्या घरगुती वापरातल्या वस्तू बाजारातून विकत घेतो. सध्या फॅशनमुळे आपण नवनवीन कपडे खरेदी करत असतो. अशा स्थितीत अनेक वेळा जुने आणि फाटलेले स्वेटर निरुपयोगी समजून फेकून दिले जातात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांना फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा वापर घरगुती कामांसाठीही करू शकता.

तुमच्याकडे जुने स्वेटर असतील तर ते निरुपयोगी समजण्याऐवजी तुम्ही त्यापासून उशीचे कव्हर, बाटलीचे कव्हर आणि वाइप्स बनवू शकता. या लेखात जाणून घेऊयात जुन्या स्वेटरपासून नवनवीन गोष्टी कशा तयार करायच्या याविषयी.

- Advertisement -

स्वेटरच्या मदतीने बनवा मोजे :

Sweater Hacks: Make socks and bottle covers from old sweaters

जुन्या, न वापरलेल्या स्वेटरच्या मदतीने तुम्ही मोजे तयार करू शकता. सर्व प्रथम, स्वेटरच्या कोणत्या भागापासून मोजे बनवायचे ते ठरवा. मोज्यांचा वरचा भाग थोडा सैल आणि आरामदायक ठेवा. तर खालचा भाग हा घट्ट असू शकतो. अशाप्रकारे तुमच्या सोयीनुसार मोजे कापून घ्या. आता अंगठ्यासाठी मध्यभागी एक लहान छिद्र सोडा. तुम्ही सॉक्सवर तुमच्या आवडीनुसार वेगवेगळी डिझाइनही करू शकता जसे की बटणे जोडणे, धाग्यांनी सजावट करणे इत्यादी.

- Advertisement -

स्वेटरच्या मदतीने बाटलीचे आवरण बनवा :

Sweater Hacks: Make socks and bottle covers from old sweaters
Image Source : Social Media

बाटलीचे आवरण तयार करण्यासाठी, स्वेटरचा एक भाग निवडा जो पूर्णपणे बाटलीला झाकू शकेल. सहसा बाजूचा भाग चांगला असतो. आता बाटली स्वेटरवर ठेवा आणि त्याभोवती रेषा काढा. अशाप्रकारे बाटलीच्या आऊटलाईन प्रमाणे चार वेळा स्वेटरवर मार्क करून घ्या. यानंतर, हे चारही तुकडे शिवून घ्या. तुम्ही हवे असल्यास, वरच्या काठावर एक लहान बटण आणि तळाशी लूप जोडू शकता. यामुळे बाटली झाकणे आणि उघडणे सोपे होईल .

जुन्या स्वेटरपासून मोपिंग कापड बनवा :

Sweater Hacks: Make socks and bottle covers from old sweaters

घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वजण रोज मॉप वापरतो. यासाठी तुम्ही जुन्या स्वेटरच्या साहाय्याने मोपिंग कापड बनवू शकता. यासाठी त्याचे छोटे तुकडे तयार करा. हे तुकडे अंदाजे 10 x 10 इंच असू शकतात. आता एक मोठा तुकडा करण्यासाठी कापलेले तुकडे एकत्र शिवून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेगवेगळ्या रंगांचे स्वेटरही वापरू शकता. शिवणकामानंतर धार मजबूत करण्यासाठी, काठावर स्ट्रिंग किंवा टेप जोडा आणि मॉपिंग स्टँडला बांधा.

जुन्या स्वेटरपासून सॉफ्ट टॉय कव्हर :

स्वेटरच्या मदतीने तुम्ही सॉफ्ट टॉयसाठी कव्हर बनवू शकता . यासाठी, स्वेटर टॉयवर ठेवून आकार तपासा. यानंतर, ते मोजा आणि कापून घ्या. आता टोकाला शिवून यामध्ये खेळणी झाकून ठेवा.

हेही वाचा : Bollywood Gossips : या अभिनेत्रीला उंची नडली, काम सुटली


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini