घरलाईफस्टाईलकैरीचे गोड लोणचे

कैरीचे गोड लोणचे

Subscribe

कैरीचे झटपट आंबट गोड लोणचे

जेवणात लोणच असल्यास जेवणाची चव अधिक चविष्ट होते. त्यात जर गोड लोणचे असेल तर अधिक उत्तम. हे गोड लोणचे भाजी नसल्यास चपातीसोबत देखील खाऊ शकतो. मात्र, काहींना बाजारातील लोणच खाण्यास आवड नाही. अशा व्यक्तींनी घरच्या घरी तयार केलेले चविष्ट आणि गोड लोणचे एकदा तरी अवश्य करुन पहा.

साहित्य

  • आंबट कैरी १ किलो
  • मोहरी डाळ १०० ग्रॅम
  • धणे ५० ग्रॅम
  • मेथी दाणे २५ ग्रॅम
  • गुळ ५०० ग्रॅम
  • २ चमचे लवंग
  • २ चमचे दालचिनी
  • २ चमचे जायफळ पुड
  • २ चमचे हिग
  • २ चमचे तिळाचे तेल
  • मीठ
  • लालतिखट चवीनुसार

कृत्ती

कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेणे. त्यानंतर धणे मेथीदाण्याची भरडपूड करुन घ्यावी. त्यानंतर गूळ बारीक किसून घेणे. त्यानंतर मोहरीडाळ, धणेपूड, मेथी पूड कोरडी भाजून घेणे. त्यानंतर हिग पूड घ्या. एका पातेल्यात लालतिखट, हिंग आणि सर्व मसाले एकत्र करून त्यावर थोडे गरम तेल ओतून घेणे. त्यानंतर किसलेले गूळ आणि मीठ टाकून एकत्र एकजीव करुन घेणे. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेल्या कैरीच्या फोडी घालून एकजीव करुन घ्या. त्यानंतर वरून तेलाची झणझणीत फोडणी करून लोणच्यावर ओतवून घ्या आणि हे लोणचे बरणीत भरून ठेवा. हे लोणचे अधूनमधून हलवत रहा, अशाप्रकारे घरच्या घरी गोड लोणचे तयार करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -