Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीSweet Potato : रताळे भाजून की उकडून खावे?

Sweet Potato : रताळे भाजून की उकडून खावे?

Subscribe

हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला असून बाजारात हंगामी फळे दिसू लागली आहेत. हंगामी फळांपैकी एक फळ म्हणजे रताळे. रताळे एक कंदमुळ आहे. याला स्वीट पोटॅटो देखील म्हणतात. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर आणि आयर्न्स भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे रताळ्याचे सेवन शरीरासाठी फायद्याचे समजले जाते. काहीजण रताळ्याचे सेवन भाजून करतात तर काहींना रताळे उकडून खायला आवडतात. पण, आरोग्यासाठी रताळे भाजून की उकडून खावे? पाहूयात…

रताळे भाजून की उकडून?

पौष्टिकतेच्या दृष्टीतून, रताळे भाजण्याऐवजी उकडून खायला हवे, कारण रताळे उकडल्याने त्यांच्यातील अॅंटी-ऑक्सिडंट तसेच राहतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

- Advertisement -

रताळे खाण्याचे फायदे –

  • उकडलेले रताळे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. याशिवाय उकडलेले रताळे पचण्यासही सोपे असते.
  • उकडलेल्या रताळ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि पाणी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
  • वजन कमी करण्यासाठी उकडेले रताळे खावे. यात कॅलरी कमी असतात आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे दिर्घकाळ पोट भरलेले राहते.
  • उकडलेले रताळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी फायदेशीर असते, कारण ते सहज पचते. खरं तर, उकडलेल्या रताळ्याचा पोत मऊ असतो, ज्यामुळे ते सहजपणे चावता येते.
  • भाजलेले रताळे आपण तूपात किंवा तेलात भाजून खातो, ज्यामुळे रताळ्यातील कॅलरी वाढतात.
  • उकडलेल्या रताळ्यात व्हिटॅमिन सी, बी6 आढळते तर भाजलेल्या रताळ्यात व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम आढळते.रताळ्यात लोह, फोलेट, तांबे यासारखी पोषकतत्वे आढळतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासह त्वचा चमकदार होते आणि अकाली सुरकुत्या येत नाही.

 

 

- Advertisement -

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini