Friday, September 29, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health स्विमिंग करण्याचे 'हे' आहेत फायदे

स्विमिंग करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

हेल्थ इज वेल्थ असे नेहमीच म्हटले जाते. आरोग्य हेल्दी राहण्यासाठी जिम, योगा सारखे कसरतीच्या गोष्टी करतो. परंतु खाण्यापिण्यावर ही लक्ष देणे तितकेच फार महत्वाचे आहे. नियमित रुपात व्यायाम करणारा व्यक्ती काही आजारांपासून दूर राहतोच पण त्याची कार्यक्षमता ही वाढली जाते. जिम, योगा व्यतिरिक्त स्विमिंग करणे सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु तुम्हाला स्विमिंग करण्याचे फायदे माहितेयत का? (Swimming health benefits)

खरंतर स्विमिंग केल्याने तुमच्या शरिरातील काही स्नायू अधिक सक्रिय होतात आणि विकसित होतात. स्विमिंगच्या वेळी तुमचे धड, बाजू, पाय, हात, पाय आणि डोकं हे लयबद्ध आणि समन्वित राहतात. तसेच स्विमिंगच्या विविध टेक्निकमुळे याचे फायदे सुद्धा वेगळे होतात. उदाहरणासाठी फ्री स्टाइलमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे पोहू शकता. ब्रेस्टट्रोकमघ्ये तुम्ही छातीच्या येथून जोर लावता. तर बटरफ्लायमध्ये संपूर्ण शरिराचा वापर केला जातो. साइड स्ट्रोकमध्ये एक हात नेहमीच पाण्यात आणि दुसरा हात पोहण्यासाठी वापरला जातो.

- Advertisement -

स्विमिंगचे फायदे
फुफ्फुसांसाठी फायदेशीर
इंडियन जर्नल ऑफ फिजियोलॉजी मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार कंपेरेटिव्ह स्टडी ऑफ लंग फंक्शन इन स्विमर्ग अॅन्ड रनर्समध्ये असे समोर आले आहे की, स्विमिंगमुळे तुमचे फुफ्फुसे मजबूत होतात. तसेच त्यामध्ये असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास ही मदत होते. स्विमिंग करताना फुफ्फुसे अधिक सक्रिय राहतात आणि दीर्घकाळ श्वास रोखून ठेवण्याची प्रॅक्टिस ही होते.

स्ट्रेंथ वाढण्यास फायदेशीर
स्विमिंग करताना पाय सतत चालवत ठेवावे लागतात. त्याचसोबत हात ही चालवावे लागतात. केवळ पाणी हवेच्या तुलनेत अधिक जड असते, यामुळेच पाण्याचा शरिरावर अधिक दबाव असल्याचा अनुभव येतो. पाण्यात हालचाल केल्याने सतत प्रतिरोध निर्माण होत राहते. यामुळेच स्विमिंग करताना आपण पुढे ढकलले जातो. यामुळे स्नायू टोन होतात आणि स्टॅमिना, स्ट्रेंथ सुद्धा वाढते.

- Advertisement -

मेंटल वैल बीइंग
व्यायामाने फिल गुड हार्मोन आणि एंडोर्फिंसला प्रोत्साहन मिळते आणि स्ट्रेस हार्मोन एड्रेनालाइन आणि कोर्टिसोलला कमी करते. लो मूड, एंग्जायटी, स्ट्रेस किंवा डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी अथवा यामुळे पीडित असलेल्या लोकांच्या उपचारादरम्यान स्विमिंग करण्याचा सल्ला दिला जातो. अन्य व्यायामाच्या तुलनेत काही लोक स्विमिंग करुन अधिक रिलॅक्स फिल करतात. (Swimming health benefits)

वजन कमी करण्यासाठी
बटरफ्लाय स्ट्रोकला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. बटरफ्लाय 10 मिनिटे जरी केले तर तरीही जवळजवळ 150 कॅलरीज बर्न होतात. कोर ऐब्डोमिनल आणि पाठीच्या खालील भागातील स्नायू श्वास घेतेवेळी शरिर पाण्याबाहेर काढते. ग्लूट्स हे सुनिश्चित करतात की, पाय डॉल्फिन प्रमाणे असावेत.

सांध्यांसाठी उत्तम स्विमिंग
आर्थ्राइटिस असो किंवा हाडांना झालेली एखादी दुखापत असेल तर स्विमिंग त्यासाठी अधिक सुरक्षित मानले जाते. रनिंग, साइक्लिंग किंवा जिम सारख्या अन्य वर्कआउट मध्ये जो धोका असतो तो म्हणजे सांध्यांमधील दुखापत. आर्थ्राइटिसच्या रुग्णांना डॉक्टर स्विमिंग करण्याचा सल्ला देतात. जेव्हा तुमचे शरिर पाण्यात असते तेव्हा अशा मुवमेंट्स करता ज्या सर्वसामान्यपणे करणे सुद्धा फार मुश्किल होते.

उत्तम झोप येते
नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थच्यानुसार वृद्धांना झोपेची समस्या असेल तर स्विमिंग त्यांच्यासाठी बेस्ट मानले जाते.


हेही वाचा-सूर्यनमस्कार करण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहे का?

पहा व्हिडिओ:

- Advertisment -

Manini