Wednesday, January 15, 2025
HomeमानिनीHealthपावसाळ्यात स्विमिंग करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

पावसाळ्यात स्विमिंग करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

स्विमिंग पूलचे नाव ऐकल्यानंतर खुप लोक एक्साइडेट होतात. उन्हाळ्यात खुप लोक स्विमिंगपूलमध्ये डुबकी मारण्यास अधिक उत्सुक असतात. जेणेकरुन कडाकाच्या उष्णतेमुळे आराम मिळेल. पण आता पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून बहुतांश जणांना असा प्रश्न पडतो की, या सीझनमध्ये स्विमिंग करणे खरचं सुरक्षित असते का? तत्पूर्वी नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याच बद्दल आपण जाणून घेऊयात.

पावसाळ्यात स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करण्याबद्दल प्रत्येकाची विविध मतं असतात. कारण असे करणे फायद्याचे किंवा तोट्याचे ठरू शकते. फायद्याचे बोलायचे झाल्यास तर तुम्ही यामुळे टेंन्शन फ्री होऊ शकता.

पावसाळ्यात स्विमिंग करण्यापूर्वी अशी घ्या काळजी
स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणे तेव्हाच सुरक्षित असेल जेव्हा ते अधिक स्वच्छ असेल. काही वेळेस कम्युनिटी स्विमिंग पूल दूषित असतात. जर तुम्ही त्यात स्विमिंग करण्यासाठी जात असाल तर नुकसान होऊ शकते.

गर्दीच्या पूलमध्ये जाऊ नका
स्विमिंग पूल स्वच्छ ठेवण्यासाठी गरजेचे आहे की, नियमित रुपात सफाई करावी. त्यातसोबत स्विमिंगपूलमध्ये क्लोरिनच्या गोळ्या टाकल्या जातात. तेव्हाच पुलमध्ये जावे. अशा गोष्टीची सुद्धा काळजी घ्यावी की, स्विमिंग पूल किंवा वॉटर पार्कमध्ये गर्दी असेल तर तेथे जाणे टाळावे. अस्वच्छ पाण्यामुळे इंन्फेक्शनचा धोका वाढला जातो.


हेही वाचा- पावसाळ्यात योगा करु नये? पहा काय म्हणतात एक्सपर्ट्स

Manini