उन्हाळ्यात आपण डिहाड्रेशन हा शब्द वारंवार ऐकतो. हल्ली तर डिहाड्रेशनची समस्या खूपच सामान्य झाली आहे. पण, या समस्येकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर, जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात पाणी कमी पिता किंवा द्रव पदार्थाचे सेवन कमी करता, तेव्हा डिहाड्रेशनची समस्या सुरू होते. अशावेळी उन्हाळ्यात लहान मुले, किशोरवयीन मुले आणि वृद्ध यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. चला तर मग जाणून घेऊयात, डिहाड्रेशनची समस्या कशी ओळखायची? त्याची लक्षणे काय आहेत?
डिहायड्रेशन म्हणजे काय?
डिहाड्रेशन ही अशी स्थिती असते, ज्यामध्ये तुमचे शरीरा तुम्ही वापरत असलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी कमावते. ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोरोलेट असंतुलन निर्माण होते.
डिहायड्रेशनची लक्षणे –
स्नायूंमध्ये क्रॅम्प्स – जेव्हा शरीरातील पाणी कमी होते, तेव्हा स्नायूंमध्ये दुखणे, क्रॅम्प्स अशा समस्या जाणवतात. त्यामुळे तुम्ही दिवसभर पाणी पिणे आवश्यक आहे.
त्वचेचा कोरडेपणा – उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही कमी पाणी पिता तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे ओठ, त्वचा आणि तोंड कोरडे पडते.
डोकेदुखी – डिहाड्रेशनचा त्रास असेल तर तुम्हाला डोकेदुखी जाणवू शकते. बऱ्याचदा तीव्र उन्हात गेल्यावरही डोकेदुखी सुरू होते.
बद्धकोष्ठता – कमी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते तर बद्धकोष्ठता डिहाड्रेशनमुळे देखील होऊ शकतो. त्यामुळे नियमित पाणी प्यावे.
लघवीचा रंग – जेव्हा तुम्ही पुरेसं पाणी पिता तेव्हा लघवीचा रंग सामान्य राहतो. पण, शरीराता पाण्याची कमतरता असेल तर लघवीचा रंग गडद होतो. अशा परिस्थितीत समजून जा की, शरीरात पाण्याची कमतरता आहे.
तहान लागणे – जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर डिहाड्रेशनचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरात कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.
शरीरात जडपणा – जेव्हा तुम्हाला शरीरात जडपणा वाटत असेल तर अशावेळी त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण हे सुद्धा डिहाडेशनच्या त्रासाचे लक्षण आहे.
हेही पाहा –