vitamin c deficiency: शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची ‘ही’ आहेत महत्त्वाची लक्षणे

बऱ्याचदा आपल्या शरीरातील व्हिटामिन सीचे प्रमाण कमी होऊ लागलते आणि आपल्याला कळत देखील नाही

symptoms of vitamin C deficiency in the body
vitamin c deficiency: शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची 'ही' आहेत पाच लक्षणे

आपल्या शरीरातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शरीरात व्हिटामिन सी योग्य प्रमाणात असणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, व्हिटामिन सी आपली इम्युन सिस्टम उत्तेजित करते. व्हिटामिन सीमुळे अनेक आजारांशी आपण लढू शकतो. मात्र बऱ्याचदा आपल्या शरीरातील व्हिटामिन सीचे प्रमाण कमी होऊ लागलते आणि आपल्याला कळत देखील नाही. शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची लक्षणे काय आहेत जाणून घ्या.

व्हिटामिन सी कमी होण्याची लक्षणे

भूक न लागणे

शरीरात व्हिटामीन सीची कमतरता असल्यास आपली भूक कमी होते. ज्यामुळे थकवा, कमजोरी यासारख्या समस्यांना सुरुवात होते. वजन कमी होऊ लागते आणि आपली संपूर्ण सिस्टिम हळू हळू कमजोर होत जाते.

थकवा जाणवणे

तुम्हाला जर सतत थकवा जाणवत असेल, कमजोर वाटत असेल तर त्वरित व्हिटामीन सीची टेस्ट करुन घ्या. शरीरातील व्हिटामीन सी कमी झाल्यास या समस्या निर्माण होतात.

अवयव दुखणे

व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव कमजोर पडून दुखू लागतात. दात ढीले पडणे, नये तुटणे, सतत पाय दुखणे, हाडे ठिसूळ यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित व्हिटामीन सीची तपासणी करावी.

व्हिटामिन सी कमी होण्याची ही सर्वसाधारण लक्षणे दिसल्यात डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार सुरू करावे.

काय काळजी घ्याल?

व्हिटामिन सीची कमतरता जाणवत असल्यास आपल्या आहारात प्रामुख्याने महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. टमाटर, संत्र, बटाटा,स्ट्ऱॉबेरी, शिमला मिर्ची,ब्रोकोली,किवा यासारखे पदार्थ खा. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही गोळ्या देखील खाल्ल्याने व्हिटामिन सीच्या कमतरता भरुन निघते.


हेही वाचा – सीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या