घरलाईफस्टाईलमास्क लावल्याने त्रास होतोय; अशी घ्या काळजी

मास्क लावल्याने त्रास होतोय; अशी घ्या काळजी

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, या व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. लोक घरात बंद आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रे यांनी अनेक मार्गदर्शक बाबी करत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यात मास्क घालणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. परंतु, अचानक मास्क लावल्याने त्वचेशी संबंधित समस्यांचा धोका नाढतो. यामुळे चेहऱ्यावर रॅशेस आणि जळजळ होण्याची शक्यता असते. तर बऱ्याच जणांना गुदमरल्या सारखे देखील होते. त्यामुळे कोणतीही खबरदारी घ्यावी हे आपण पाहणार आहोत.

जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा

- Advertisement -

त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आपला चेहरा नेहमीच हायड्रेटेड ठेवा. यासह त्वचा ओली ठेवा. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारेल आणि सतत मास्क लावल्यामुळे त्वचेच्या समस्याही दूर होतील.

दोन तासांनी मास्क काढा

- Advertisement -

दर दोन तासांनी चेहऱ्यावरून मास्क काढले पाहिजे. यामुळे मोकळा श्वास घेण्यास मदत होते. मात्र, हे मास्क केवळ घरातच काढा.

मास्क व्यवस्थित ठेवा

मास्क अशा जागी ठेवा जिथे संक्रमणाचा धोका खूप कमी असेल.

चेहरा पुसून नंतर मास्क लावा

चेहऱ्याला घाम आला असेल तर मास्क लावू नये. आपण घामेजलेल्या त्वचेवर मास्क लावले तर यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते. अशात मास्क लावण्यापूर्वी आपला चेहरा मऊ टॉवेलने पुसून घ्या आणि त्यानंतर मास्क लावा.

फेस क्रीमचा वापर करा

मास्क लावाल तेव्हा त्याच्या ३० मिनिटानंतर अगोदर फेस क्रीमचा वापर नक्की करा. यानंतरच मास्क घाला.

हात हँडवॉशने धुवा

मास्क काढल्यावर सर्वप्रथम आपले हात हँडवॉशने धुवा. त्यानंतर चेहरा फेस वॉशने धुवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -