Friday, February 23, 2024
घरमानिनीBeautyथंडीत चेहरा, केस आणि पायांची अशी 'घ्या' काळजी

थंडीत चेहरा, केस आणि पायांची अशी ‘घ्या’ काळजी

Subscribe

हिवाळा सुरु झाला की हा फक्त चेहर्‍याचीच त्वचा नाही तर हाताची, पायांची त्वचा देखील कोरडी पडते. त्यामुळे थंडीत आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

केसांसाठी

Hair Care: Complete guide to thick and healthy hair - Pure Sense

- Advertisement -

हिवाळ्यातील थंडीमुळे केस निर्जीव बनतात. यासाठी केसांना नियमित डीप कंडिशनिंग मास्क लावून मगच केस विंचरा. अन्यथा ते विंचरताना तुटतील. बाजारात अनेक कडिंशनिंग मास्क मिळतात. तुम्ही ते घरी सुद्धा बनवू शकता. यासाठी 1 चमचा ग्लिसरीनमध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल , व्हिनेगर, कॅस्टर ऑईल व्यवस्थित मिसळून घ्या. केस धुण्यापूर्वी 10 मिनिटे आधी हे केसांना लावा नंतर केस स्वच्छ शॅम्पूने धुवा.

चेहर्‍यासाठी

The Simple Skin Care Routine Everyone Should Do Every Day, According to  Experts

- Advertisement -

हिवाळ्यात हवा थंड आणि कोरडी असते. त्याचा परिणाम चेहर्‍यावर लगेच दिसून येतो.चेहर्‍याची त्वचा खूप ड्राय होते. अशावेळी चेहर्‍याच्या त्वचेसाठी हायड्रेटेट क्रिम वापरावी. याने चेहर्‍याच्या त्वचेचे रक्षण होईल. जर चेहरा जास्तच कोरडा झाला असेल तर दिवसातून कमीत-कमी 2-3 वेळा मॉईश्चरायझर लावा.

कोपर आणि गुडघ्यांसाठी

कोपर, गुडघ्यांवर काळी पडणारी त्वचा खराब दिसते. हिवाळ्यात यावर फाटलेली त्वचा गोळा होऊन, पापुद्रा तयार होतो. यापासून सुटका करण्यासाठी, त्यावर नियमित स्क्रब जेलचा वापर केल्यास ही समस्या मिटवता येईल. तसेच कोपर जास्तच फुटलेले असतील तर एक्स्ट्रा रिच मॉईश्चरायझर क्रिमचा वापर करावा.

टाचांसाठी 

Foot Care: Why is It Important for You - HealthKart

  • थंडीच्या दिवसात अनेकांच्या टाचा फुटतात.
  • तेव्हा तुम्ही पॅडिक्यूअर देखील करु शकता.
  • सुरुवातीला नेलपॉलिश हटवून नखे कापून घ्या.
  • कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवा आणि हलकासा मसाज करा.
  • आता फ्रुट स्क्रबरने गुडघ्यापासून ते पायाच्या पंजांपर्यंत हलकेच घासून स्क्रब करून घ्या.
  • नंतर एका उत्तम दर्जाच्या फ्रुट क्रिमने पायांना मसाज करा.
  • मसाज करताना पायांच्या टाचेकडे विशेष लक्ष द्या.
  • क्रिमने मसाज केल्यानंतर पायात मोजे घाला. म्हणजे पाय सुरक्षित राहतील.

हेही वाचा :

थंडीत सतत पेट्रोलियम जेलीचा वापर करताय? व्हा सावध…

- Advertisment -

Manini