Monday, January 20, 2025
HomeमानिनीBeautyWinter Foot Care Tips : हिवाळ्यात पायांची काळजी अशी घ्या

Winter Foot Care Tips : हिवाळ्यात पायांची काळजी अशी घ्या

Subscribe

हिवाळा सुरु झालेला असून, सगळीकडे थंडगार वातावरण निर्माण झालं आहे. या वातावरणात बऱ्याचदा आपली त्वचा कोरडी पडते. हिवाळ्यात आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा आपण आपल्या चेहऱ्याची आणि हातांच्या त्वचेकडे लक्ष देतो. परंतु हिवाळ्यात आपल्या चेहऱ्याच्या आणि हातांच्या त्वचेसहपायांची त्वचा देखील कोरडी होते , पायांना खाज येते. त्यामुळे पायांची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. वाढत्या थंडीमुळे आळस देखील वाढतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, विशेषत: आपल्या पायावर आणि काळजी न घेतल्यास वेदनादायक होऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात हिवाळ्यात पायांची काळजी कशी घ्यायची.

हिवाळ्यात पायांना या समस्यांना सामोरे जावे लागते:

  • उच्च रक्तदाबामुळे रक्ताभिसरण बिघडल्याने आणि शरीरात व्हिटॅमिन डी आणि ईच्या कमतरतेमुळे पायात मुंग्या येऊ शकतात.
  • पायांचे सुन्न होणे ही समस्या उद्भवू शकते.
  • कमी तापमानामुळे हात-पायांवर थंडी जाणवते.
  • खराब रक्ताभिसरण, मधुमेह आणि न्यूरोपॅथी असलेल्या रुग्णांना विशेषतः हिवाळ्यात पायांच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
  • पायांना खाज येणे. हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे पाय कोरडे होतात त्यामुळे पायांना खाज सुटते.

या सर्व समस्या हिवाळा सुरु झाल्यावर सुरु होतात. बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे या समस्या अजून वाढतात. या अडचणी वेळीच थांबण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता.

पायांना मॉइश्चरायझ करा

हिवाळ्यात आपले पाय लगेच कोरडे होतात त्यामुळे पायांना खाज सुटे त्यामुळे पायांना रोज मॉइश्चरायझ आणि मसाज करा. काही दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल.

पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवा

थंडीत आपले पाय लगेच कोरडे तर होतात. त्याचबरोबर टाचांना भेगा देखील पडतात. अशावेळी तुम्ही पाणी गरम करा आणि नंतर त्यामध्ये शॅम्पू आणि लिंबाचा रस घाला. आता 15 ते 20 मिनिटे पाय बुडवून ठेवा. नंतर क्लिनिंग ब्रश आणि प्युमिस स्टोनने पाय स्वच्छ करा. यामुळे पाय कोरडे होणार नाही. टाचांना भेगा देखील पडणार नाही.

जास्त वेळ अंघोळ करू नका

हिवाळ्यात जास्त वेळ आंघोळ करू नका. जास्त वेळ आंघोळ केल्याने, त्वचेमध्ये असलेलं नॅचरल ऑइल निघून जाते. यामुळे पाय लगेच कोरडे पडतात आणि टाचांना भेगा देखील पडतात.

सनस्क्रीन लावा

आपण बऱ्याचदा उन्हाळयातच सनस्क्रीन लावतो. हिवाळ्यात याचा वापर करत नाही. हिवाळ्यात देखील त्वचेला सनस्क्रीनची गरज असते. त्यामुळे पायांना सनस्क्रीन लावा.

पायांच्या नखांची काळजी घ्या

जर तुम्हाला तुमचे पाय सुंदर दिसावे असं वाटत असेल तर वेळीच पायांची नखे कापा.

तेलाने मसाज करा

हिवाळ्यात आपले पाय लगेच कोरडे होतात त्यामुळे तेलाने पाय मसाज करा.

हेही वाचा : Beauty Tips : हिवाळ्यात कोरड्या केसांसाठी होममेड केअर


Edited By : Prachi Manjrekar

Manini