Thursday, April 11, 2024
घरमानिनीHealthउन्हाळा सुरु होताच अशी घ्या आरोग्याची काळजी

उन्हाळा सुरु होताच अशी घ्या आरोग्याची काळजी

Subscribe

आता हळूहळू थंडी कमी होत असून उन्हाळ्याची सुरुवात होत आहे. या बदलत्या वातावरणात अनेक आजार बळावण्याची शक्यता असते. या आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात काय खावे? काय खाऊ नये? तसेच कोणते कपडे घालावे? या सर्व गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे.

उन्हाळा सुरु होताच अशी घ्या काळजी

Summer Health Tips You Must Follow This Year - HealthKart

- Advertisement -
  • उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी प्यावे. फ्रिजमधील पाणी न पिता माठातील थंडगार पाणी प्यावे. फ्रिज, कुलरमधील थंडगार पाणी प्यायल्याने घसा, दात, आतडी यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  • बाजारात मिळणाऱ्या फळांचा ज्यूस, कोल्डड्रींक्स, आईस्क्रिम यांसारखे पदार्थ टिकण्यासाठी त्यांमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यास पचनशक्तीवर परिणाम होतो. हे पेय उन्हाळ्यात पिऊ नये. त्याऐवजी तुम्ही घरी बनवलेला लिंबू सरबत, कोकम सरबत पिऊ शकता.
  • उन्हाळ्यातील मौसमी पदार्थ म्हणजेच कैरी, लिंबू, करवंद, फणस, जांभूळ यांचे सेवन करावे. तसेच दररोज सरबत, ताक, नारळ पाणी, जिर्‍याचे पाणी, गायीचे तूप आदी थंड पेयांचा आहारात समावेश करावा.

Boost your Immunity this Summer with Healthy Diet Tips | Summer

  • उन्हाळ्याच्या दिवसात साधा, पौष्टिक आहार घ्यावा. थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच शिळे अन्न, तळलेले पदार्थ, आंबट लोणचे, जास्त तिखट, खारट, कडू पदार्थ खाऊ नयेत.
  • उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी मांसाहार करावा, कारण मांसाहारामध्ये अधिक उष्णता असते. याचा त्रास आपल्या आरोग्याला होऊ शकतो.
  • या दिवसात घराबाहेर फिरायला जाताना सोबत टोपी, स्कार्फ, गॉगल आदी वस्तू सोबत ठेवाव्या. तसेच फिकट रंगाच्या सैलसर सुती कपडे परिधान करावे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

Buttermilk Benefits : जेवणानंतर ताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे!

- Advertisment -

Manini