Thursday, March 20, 2025
HomeमानिनीHealth Tips : मासिक पाळीच्या वेळी अशी घ्या स्वतःची काळजी

Health Tips : मासिक पाळीच्या वेळी अशी घ्या स्वतःची काळजी

Subscribe

मासिक पाळीचा काळ खूप अवघड असतो. या काळात महिलांना अनेक समस्याना सामोरे जावे लागते. ओटीपोटात दुखणे पाठ दुखणे आणि मूड बदलणे इत्यादी या दरम्यान स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्यास वेदना अजून वाढू शकतात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात मासिक पाळीच्या वेळी स्वतःची कशी काळजी घ्यावी.

आहार आणि पोषण

तुम्ही आहारात गरम पाणी, हर्बल टी आल्याचा चहा, कॅमोमाइल टी घेऊ शकता. लोह आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे पालक, दुधाचे पदार्थ, बदाम, अंजीर, सुकामेवा यांचा आहारात समावेश करावा.ओमेगा-3 युक्त अन्न तीळ, फ्लॅक्ससीड, मासे हे दाहकता कमी करतात.गोड आणि तळलेले पदार्थ टाळा याने तुम्हाला अजून वेदना जाणवू शकतात. साखर आणि जास्त तेलकट पदार्थांमुळे सूज आणि वेदना वाढू शकतात.

पाणी आणि हायड्रेशन

दिवसभर भरपूर पाणी प्यावे. खोबरेल पाणी किंवा सूप घेऊ शकता.याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

व्यायाम आणि हलकी हालचाल

सौम्य योगासनं जसे की बालासन, सुप्त बद्धकोणासन आणि स्ट्रेचिंग याने आराम मिळतो. हलक्या चालण्याने रक्ताभिसरण सुधारते.

गरम पॅड किंवा शेक

पोट किंवा कंबरेवर गरम पाण्याची पिशवी ठेवावी. गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्नायू शिथिल होतात.

स्वच्छता आणि हायजीन

वेळेवर सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पॉन बदलावे दर 4-6 तासांनी कापडी पॅड किंवा मेंस्ट्रुअल कप वापरत असल्यास स्वच्छता राखावी. बाह्य भाग हलक्या साबणाने धुवावा, अँटीसेप्टिक लोशन टाळावे.

विश्रांती आणि झोप

पुरेशी झोप घ्यावी कमीत कमी 7-8 तासांची चांगली झोप घ्यावी. झोपताना उशीखाली पाय ठेवल्याने वेदना कमी होतात.

ताण कमी करणे

ध्यान, श्वसन व्यायाम, हलका संगीत ऐकणे याने मन शांत राहते. तणाव टाळल्याने हार्मोन्स बॅलन्स राहतात.

हेही वाचा : Exercise : सकाळी की संध्याकाळी? व्यायाम करण्याचे मिळतील फायदे


Edited By : Prachi Manjrekar

Manini